केतकी माटेगावकर ‘बिग बॉस मराठी’च्या घरात?

ketki-mategaonkar
वादग्रस्त पण तेवढ्याच प्रमाणात लोकप्रिय असलेल्या ‘बिग बॉस’च्या पहिल्या मराठी पर्वाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला होता. त्या प्रतिसादानंतर आता लवकर या शोच्या नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. पण या नव्या पर्वात कोणते कलाकार सहभागी होणार याची प्रेक्षकांमध्ये असलेली उत्सुकता चांगलीच ताणली गेलेली आहे. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांच्या नावात छोट्या पडद्यावरील अभिनेता शैलेश दातार, अक्षया गुरव, वीणा जगताप, अर्चना निपणकर, गौतम जोगळेकर यांच्या नावांसोबतच गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर यांची चर्चा होत आहे. दरम्यान केतकी माटेगावकर ही ‘बिग बॉस मराठी’च्या घरात केतकी जाणार असल्याचे म्हटले जात आहे. तिने यासंदर्भात एक पोस्ट इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिली आहे.

View this post on Instagram

PLEASE NOTE. #rumour #nottrue

A post shared by Ketaki Mategaonkar (@ketakimategaonkar) on


केतकीने इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे, की सर्वजण बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत. बिग बॉस पाहायला मलासुद्धा खूप आवडते आणि दुसऱ्या पर्वासाठी मीदेखील खूप उत्सुक आहे. बिग बॉसमध्ये मी सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. पण ही फक्त अफवा आहे. माझा असा या वर्षी कोणताच प्लॅन नाही. पण या शोमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात ती सहभागी होणार असल्याच्या चर्चांना केतकीच्या या पोस्टमुळे पूर्णविराम मिळाला आहे. पण इतर कोण या शोमध्ये झळकणार आणि या पर्वाचे सुत्रसंचालन कोण करणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

Leave a Comment