‘केसरी’ने बॉक्स ऑफिसवर गाठला 150चा टप्पा

kesari
सध्या बॉक्स ऑफिसवर अभिनेता अक्षय कुमारचा केसरी या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल 150 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. अनुराग सिंह यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकला आहे. पहिल्या आठवड्यातच केसरी चित्रपटाने 100 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट परदेशातील चित्रपटागृहातही धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाची आतापर्यंत वर्ल्डवाइड कमाई 150 कोटी झाली आहे. ही माहिती चित्रपटाचा निर्माता करण जोहरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिली आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवर करण जोहरने चित्रपटाचा बॅनर शेअर केला आहे. त्याने त्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, केसरीने जगातील बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली आहे. प्रेक्षकांकडून चित्रपटातील अक्षय कुमारच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. हा चित्रपट देशातील एकूण 3600 स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला आहे, तर या चित्रपटाला परदेशातील एकूण 600 स्क्रीन मिळाल्या आहेत.


बॅटल ऑफ सारागढीच्या कथेवर केसरी हा चित्रपट आधारित आहे. 21 सिख, 10 हजार अफगानी सेनेसोबतची लढाई चित्रपटामध्ये दाखवले आहे. याला आतापर्यंतची सर्वात कठीण लढाई समजली जाते. चित्रपटात अक्षय कुमारने हवालदार ईश्वर सिंह यांची भूमिका साकारली आहे.

Leave a Comment