हिमेश रेशमिया बनवणार या जवानाच्या आयुष्यावर आधारित बायोपिक

himesh-reshamiya
अवैध प्रकारे शस्त्रास्त्रे खरेदी केल्याप्रकरणी शिक्षा भोगलेल्या अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित संजू या चित्रपटाला मिळाल्यानंतर बॉलीवूडमध्ये बायोपिक बनवण्याची एक प्रकारे प्रथाच सुरु झाली आहे. संजू बायोपिकनंतर अनेक खेळाडू आणि राजकीय नेत्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आपल्या भेटीला आले. पण आता अभिनेता हिमेश रेशमिया भारतीय जवानावर बायोपिक काढणार असल्याचे समोर आले आहे.

बऱ्याच दिवसांपासून संगीतकार, गायक, अभिनेता हिमेश रेशमिया रुपेरी पडद्यापासून दूर होता. तो त्याच्या चाहत्यांसाठी तब्बल ४ चित्रपट घेऊन येत आहे. त्यातील एक चित्रपट भारतीय सैन्यदलातील जवान बिष्णू श्रेष्ठा यांच्या जीवनावर आधारित आहे. हिमेशने या चित्रपटाचे अलिकडेच हक्क विकत घेतले असल्याचे चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ट्विटरद्वारे सांगितले आहे.


२०१० साली बिष्णू यांनी धावत्या रेल्वेमध्ये दहशतवाद्यांशी मुकाबला करुन रेल्वेप्रवाशांची कशा प्रकारे सुटका केली हे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. बिष्णू श्रेष्ठा यांना या मोलाच्या कामगिरीसाठी भारत सरकारने शौर्य पुरस्कार प्रदान केले होते. बिष्णू श्रेष्ठा यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची कथा लिहून पूर्ण होताच चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच अद्याप चित्रपटाचे नाव आणि चित्रपटातील कलाकार यांची घोषणा झालेली नाही.

Leave a Comment