गुगल मॅपमध्ये क्लासिक स्नेक गेमचा झाला समावेश

google
नवी दिल्ली : सध्याचे युग हे डिजीटल झाले असून प्रत्येकाच्या हातात आता अँड्रोईड मोबाईल दिसतोच. त्यातच प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कोणत्या न कोणत्या गेमचा समावेश असतोच. पण आज गुगल मॅप्समध्ये एकेकाळी मोबाईलवरचा सर्वात लोकप्रिय गेम म्हणजे ‘स्नेक’ गेमचा समावेश करण्यात आला आहे. हा गेम अॅपवर फक्त थोड्याच दिवसांसाठीच समाविष्ट करण्यात आला आहे. हा गेम मॅप्स अॅपवर जाऊन खेळता येणार आहे.

गुगलच्या मते, आता आयओएस आणि अँड्रॉईडसाठीही हा गेम रोल आउट करण्यात आला असून तो पुढील एक आठवडा अॅपवर उपलब्ध असणार आहे. तुमच्याकडे जर गुगल मॅप्स हे अॅप नसेल तर हा गेम खेळण्यासाठी गुगलने एक स्वतंत्र साईटही तयार केली आली आहे.

अॅपच्या टॉप लेफ्ट कॉर्नरकडील मेन्यू ओपन केल्यानंतर येथे मेन्यूतून स्नेक गेम सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला एक शहर सिलेक्ट करावे लागेल. मग स्वाइप केल्यानंतर आपली ट्रेन किंवा बस आपण मॅपवर फिरवू शकता आणि प्रवाशांना घेऊ शकता. यात पुर्वीच्या क्लासिक स्नेक्स गेमप्रमाणे कोणताही स्नेक नाही पण ही ट्रेनच प्रवाशांना घेण्यासोबतच लांबच लांब होत जाते. तोपर्यंत गेम सुरू राहतो, जोपर्यंत आपली ट्रेन किंवा बस चुकून स्वत:शीच धडक घेत नाही.

Leave a Comment