जेट एअरवेज साठी गौतम अडाणी लावणार बोली?

adani
अडाणी उद्योगसमूह जेट एअरवेज च्या खरेदीसाठी बोली लावणार असल्याचे वृत्त आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेजचे प्रमोटर नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांनी २५ मार्च रोजी झालेल्या कंपनीच्या बोर्ड मिटिंग मध्ये सदस्यत्व राजीनामा दिला असून आता या विमान कंपनीच्या विक्रीसाठी ३० एप्रिल रोजी अंतिम बोली लावली जाणार आहे. त्यासाठीची बोली प्रक्रिया लवकरच सुरु होत असल्याचे समजते. जेट एअरवेज ने २५ मार्चच्या मिटिंग मध्ये प्रशासन बदलाला मंजुरी दिली आहे.

अडाणी समूह लॉजिस्टिक, खाण उद्योग, उर्जा, कृषी क्षेत्रात प्रथमपासून आहेच पण फेब्रुवारी मध्ये या समूहाने हवाई क्षेत्रात प्रवेश केला आहे. पीपीपी मोड खाली त्यांनी देशातील सहा विमानतळ संचालनासाठी लागलेल्या सर्व बोली जिंकून या क्षेत्रात पाय टाकला होता. यात अहमदाबाद, लखनौ, जयपूर, तिरुवनंतपुरम, मंगलोर, गोहाटी विमानतळांचे संचालन करण्यासाठी बोली लावली गेली होती. अदाणी समूहाचा व्यवसाय देश विदेशात आहे.

gautama
अडाणी समूहाने पाच वर्षापूर्वी बजेट विमान कंपनी स्पाईस जेट मध्ये गुंतवणूक केली असून त्यावेळी कंपनीचे तत्कालीन प्रमोटर कलानिधी मारन खरेदीदाराच्या शोधात होते कारण त्यांना या कंपनीतून बाहेर पडायचे होते. अडाणी यांची गुजरात बाहेर एक विमान कंपनी आहे असे समजते. जेट एअरवेज कडे सध्या ११९ विमाने असून त्यातील फक्त ३५ विमाने वापरात आहेत. २७ मार्च रोजी नागरी हवाई उड्डाण मंत्रालय आणि जेटचे सीइओ विनय दुबे आणि जेट अधिकारी यांच्यात एक बैठक झाली होती त्यात जेटने एप्रिल अखेर ७५ विमाने पुन्हा सेवेत आणली जातील असे आश्वासन दिले होते असेही समजते. त्याचप्रमाणे सध्या सेवेत असलेल्या ३५ विमानांची सेवा सुरु ठेवली जाईल असेही सांगितले होते.

जेटने इतिहाद या सौदी विमानसेवा कंपनीसोबत पूर्वीच भागीदारी केलेली असून इतिहादचा जेट मध्ये २१ टक्के हिस्सा आहे असे सांगितले जाते.

Leave a Comment