चोरीच्या अलिशान गाड्यांची मागणी वाढली

stolen
देशात सध्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून या काळात मोठ्या अलिशान गाड्यांना अधिक मागणी येत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे ही मागणी नव्या कार्ससाठी नाही तर चोरीच्या कार्स साठी आहे. राजधानी दिल्लीतून गेल्या काही दिवसात दररोज सरासरी ५ ते १० मोठ्या गाड्या चोरीस जात आहेत. चोर बाजारात एसयुव्ही गाड्यांच्या मागणीत आलेली तेजी हे यामागे एक कारण असू शकते असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलिसांच्या मताने दिल्लीत चोरी होणाऱ्या एसयूव्ही तसेच अन्य मोठ्या कार्स नेपाळ पर्यंत विकल्या जातात मात्र निवडणूक काळात चोरी होणाऱ्या मोठ्या कार्स बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, मिझोरम, नागालँड, आसाम, हरियाना या राज्यात विकल्या जातात. निवडणुकीतील छोटे मोठे नेते आणि पक्ष कार्यकर्ते प्रचारासाठी अश्या कार्स वापरतात असे समजते. निवडणूक काळात अनेक राज्यात अश्या गाड्यांचा वापर वाढतो असे निरीक्षण नोंदविले गेले आहे.

cars
मोठ्या गाड्यांना अधिक मागणी असण्यामागे या गाड्यातून जादा लोक बसू शकतात, जादा सामान वाहून नेता येते तसेच खराब रस्त्यावर त्या सहज धावू शकतात अशी अनेक कारणे सांगितली जातात. चोर बाजारात त्या स्वस्तात मिळतात. सध्या चोर बाजारात फोर्च्युनर गाडी ३ ते ५ लाखात, इनोवा ३ ते ५ लाखात, क्रेटा १ ते दीड लाखात, स्विफ्ट डिझायर ८० ते सव्वा लाखात, ब्रेजा ३० हजारापासून दीड लाखात विकल्या जात आहेत तर रॉयल एन्फिल्ड २० ते ३० हजारात मिळत आहेत असे समजते.

Leave a Comment