आपल्या अंर्तवस्त्रात या परदेशी महिलेने लपवले होते दीड किलो सोने

gold
आजवर सोन्याची तस्करी सोन्याची तस्करी करण्याच्या वेगवेगळे प्रकार आणि त्यानंतर तस्करी करणाऱ्यांना झालेली अटक याबाबत ऐकलेच असेल. पण एका महिलेने असाच कारनामा चेन्नई एअरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्यांना चकवा देण्यासाठी केला. या महिलेला असा अतिविश्वास होता की, ती तिचा उद्देश पूर्ण करणार, पण ही महिला तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पकडली गेली.

एक महिला परदेशातून २९ मार्च २०१९ रोजी भारतात परतली. कस्टम अधिकाऱ्यांनी मूळची थायलॅंड असणारी क्रायसॉर्न थामप्राकोप नावाच्या या महिलेला अटक केली आहे. मोठ्या शिताफीने क्रायसॉर्न दीड किलो सोन्याची तस्करी करत होती. पण तिचा हा प्रयत्न कस्टम अधिकाऱ्यांनी हाणून पाडला.
inner1
क्रायसॉर्नला पार्किंगच्या सीमेजवळ सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी थांबवले तेव्हा तिला धक्का बसला. क्रायसॉर्नने आधी चलाखी करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा तिची झडती घेण्यात आली तेव्हा अधिकारीही हैराण झाले. साधारण दीड किलो सोने क्रायसॉर्नने तिच्या ब्रामध्ये लपवले होते. साधारण ४७ लाख रूपयांच्या आसपास या सोन्याची किंमत सांगितली जात आहे. सोबतच कस्टम अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला सुद्धा अटक केली ज्याला क्रायसॉर्न सोने देणार होती.

येथील लवलीन कश्यप नावाच्या व्यक्तीला सोन देण्यासाठी क्रायसॉर्न आली होती. मीडिया रिपोर्टनुसार, लवलीन चंडीगढचा राहणारा असून लवलीनची गर्लफ्रेन्ड बॅंकॉकमध्ये राहते, हे सोने तिनेच क्रायसॉर्नकडे दिले होते. मीडिया रिपोर्टनुसार, कस्टमच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, क्रायसॉर्नला हे सोने बॅंकॉकमध्ये राहणारी लवलीनची गर्लफ्रेन्ड सपनाने दिले होते आणि लवलीनकडे भारतात सोपवण्यास सांगितले होते. क्रायसॉर्नला लवलीनचा एक फोटोही सपनाने दिला होता. ती ज्याद्वारे त्याला भेटणार होती.

Leave a Comment