टीआरपीत पुन्हा दाखल झाला ‘द कपिल शर्मा शो’

kapil-sharma
‘द कपिल शर्मा शो’मधून नवज्योत सिंग सिद्धू बाहेर गेल्याचा चांगलाच फटका शोला बसला. टीआरपीमध्ये हा शो खूप खाली घसरला गेला. पण आता कपिलचा हा शो पुन्हा एकदा टॉप ५ मध्ये आला आहे. ब्रॉडकास्ट रिसर्च ऑडियन्स काऊन्सिलने (BARC) २०१९ च्या १२ व्या आठवड्यातील (१६ मार्च ते २२ मार्च) रेटिंग नुकत्याच जारी केल्या. कपिलच्या शोला यात २.४ रेटिंग मिळाले असून या शर्यतीत तो चौथ्या स्थानावर आहे.

कपिलच्या या शोचा दुसरा सीझन गेल्या वर्षी २९ डिसेंबरपासून सुरू झाला होता. कपिलने या शोमधून कमबॅक केल्यानंतर २०१९ मध्ये या शोला अपेक्षित यशही मिळाले. सलमान खानने यावेळी कपिल शर्मा शोवर पैसा लावला आहे. कपिलसोबत संपूर्ण टीमला टीआरपीमध्ये वाढ मिळण्याची अपेक्षा होती. पण सिद्धू यांच्या वादानंतर शोचा टीआरपी सातत्याने कमी होत गेला.

शोचे प्रशिक्षक नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुलवामावरील दहशतवादी हल्ल्यानंतर एक वक्तव्य केले. ते या वक्तव्यामुळे चांगलेच अडकले. हे संपूर्ण प्रकरण एवढे चिघळले की, या शोमधून त्यांना बाहेर काढावे लागले. त्यांच्या जागी अर्चना पुरन सिंगची शोमध्ये एण्ट्री झाली. या सर्व विवादानंतर शोचा टीआरपी घसरला आणि एकावेळी टॉपमध्ये राहणारा हा शो सातव्या स्थानावर फेकला गेला. पण आता कपिलचा हा शो पुन्हा एकदा टॉप ४ मध्ये आला आहे.

Leave a Comment