पोलिसांनी समोर आणल्या सीरियल किलर जेफरी ढॅमरने केलेल्या हत्येच्या भयकथा

serial-killer
अमेरिकेतील पोलिसांनी सर्वात क्रूरकर्मा सीरियल किलर जेफरी ढॅमरने केलेल्या हत्येच्या भयकथा समोर आणल्या असून जेफरी होमोसेक्शुअल होता, महिला आणि पुरुष अशा दोहोंसोबत जो शारीरिक संबंध ठेवत होता. त्याच्या याच व्यसनाने त्याला एक कुख्यात आणि क्रूर गुन्हेगार बनवले. आपल्या शरीराची भूक भागवण्यासाठी त्याने पुरुष आणि युवा तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवले. पोलिस रेकॉर्डनुसार, १७ तरुणांना ड्रग्स देऊन त्याने त्यांच्यावर बलात्कार केला आणि यानंतर त्यांचा खून केला. त्याचबरोबर तो त्या लोकांचे तुकडे करून मांस देखील अगदी शिजवून खायचा.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९७८ ते १९९१ दरम्यान जेफरीने ही कृत्ये केली आहेत. त्याला पोलिसांनी अटक केली तेव्हा त्यांनी याला Milwaukee Monster असे नाव दिले. तो एक जिवंत राक्षस असल्याचे पोलिस म्हणाले होते. सीरियल किलरची पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा त्याने मानवी अंग किचनमध्ये ठेवल्याचे स्पष्ट केले. त्याने हे मानवी मांस शिजून खाल्ले असल्याची कबुलीही त्याने दिली. पोलिस यानंतर सविस्तर तपास करण्यासाठी त्याच्या फ्लॅटवर पोहोचले. अधिकाऱ्यांनी फ्रिज उघडले तेव्हा धक्काच बसला. त्यामध्ये मानवी शिर आणि त्यांच्या शरीराचे तुकडे कापून ठेवण्यात आले होते. काही तुकड्यांवर तर मसाले सुद्धा लावून ठेवण्यात आले होते. जणू तो ते काढून कधीही खात होता. मानवी शरीराचे तुकडे, मांस आणि हाड त्याच्या फ्लॅटमध्ये सर्वत्र विखुरले होते.

आपल्यापेक्षा कमी वयाच्या तरुणांशी जेफरी आधी मैत्री करून त्यांना ड्रग्स घेण्यासाठी घरी बोलवायचा. यानंतर त्यांच्यावर बलात्कार करून अतिशय निर्घृणरित्या त्यांचा खून करत होता. नरभक्षक होऊन कित्येक वर्षे मानवी मास खाणाऱ्या या नराधमाला पोलिसांनी १९९१ मध्ये पकडले होते. एक तरुण त्याच्या तावडीतून त्यावेळी सुटला आणि थेट पोलिस स्टेशन गाठून आपबिती मांडली.

एवढे अमानुष कृत्य जेफरीने केले आहे की याला कोणती शिक्षा द्यावी असा प्रश्न न्यायाधीशांना पडला होता. त्या नराधमासाठी कुठल्याही प्रकारची शिक्षा कमीच वाटत होती. न्यायालयाने त्याला ९०० वर्षांची कैद सुनावली. यानंतरही त्याला जगण्याचा अधिकार नसल्याचे म्हणणाऱ्या पीडितांच्या कुटुंबियांनी वरिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केल्या. त्यावर सुनावणी सुरू असतानाच १९९४मध्ये दुसऱ्या एका कैद्याने तुरुंगातच त्याची हत्या केली.

Leave a Comment