नेहमी जास्त एनर्जी ड्रिंक पिण्यामुळे असे झाले जीभेचे हाल

tongue1
सध्या सोशल मीडियावर एका ऑस्ट्रेलियन नागरिकाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हायरल फोटोमध्ये त्या व्यक्तीच्या जीभेचे झालेले हाल आपल्या पाहायला मिळत आहे. त्याबद्दलची माहिती त्याने सोशल माडियावर शेअर केली आहे.
tongue
ऑस्ट्रेलियन व्यक्तीने असा दावा केला आहे की तो दररोज सुमारे 6 केन एनर्जी ड्रिंक पितो आणि असे तो मागील एका वर्षापासून करत आहे, ज्यामुळे त्याच्या जीभेची सालपाटे निघाली आहेत. डेन रॉयल नामक व्यक्तीने त्याच्या जीभेचा एक फोटो फेसबुकवर शेअर करताना सांगितले आहे की, एनर्जी ड्रिंक पिताना काळजी घेत जा.
tongue2
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, डेन दररोज 5 ते 6 एनर्जी ड्रिंकचे कॅन पीत असे. नंतर डॉक्टरांनी त्याला चेतावणी दिली की हे त्याच्या जीभेसाठी हानीकारक आहे. एनर्जी ड्रिंकमध्ये एमिनो अॅसिड, बीटामाइन बी, हर्बल पदार्थ आणि एक कॅनमध्ये 58 ग्रॅम साखर असते.
tongue3
डेनने आपल्या सालपटलेल्या जीभेचा फोटो सोशल मिडियावर शेअर करताना त्याच्या पोस्टमध्ये लिहिले एनर्जी ड्रिंक कोन पितात? त्यांना पिण्याचे व्यसन आहे का? आपण याबद्दल पुन्हा विचार केला पाहिजे. या फोटोकडे लक्षपूर्वक लक्ष द्या …ते आपल्या जीभेला असे बनवते. त्याचप्रमाणे आपल्या आंतरिक अवयवांप्रमाणे काय होईल याची कल्पना करा.
tongue4
डेनने पुढे त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की मी दररोज 5-6 एनर्जी ड्रिंक पीत होतो आणि त्यानंतर मला डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता पडली. येथे मला कळले की या पेयामध्ये असलेले केमिकल्स माझ्या जीभेसाठी हानीकारक आहेत.
tongue5
आपल्या माहितीसाठी डेन रॉयल पेशाने शिक्षक आहे. तथापि, डॉक्टरांनी स्पष्ट केले नाही की दररोज किती एनर्जी ड्रिंक पिण्याने जीभेचे असे हाल होतात. त्याचबरोबर दातांचे डॉक्टर याबाबत लोकांना सावध करताना सांगतात कि साखर आणि जास्त आम्ल असणारे पदार्थ खाणे अथवा पिणे तोंडाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

Leave a Comment