मुंबई: सध्याच्या महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना कसे तरी आपले घर चालवावे लागते. त्यातच त्यांच्या मुलांनी त्यांच्याकडे स्मार्ट एलईडी टिव्हीची मागणी केली तर त्यांना पूर्ण करता येत नाही. कारण स्मार्ट एलईडी टिव्हीची किंमत अवाच्या सवा असते. पण अशा सर्वांसाठी नोबेल स्किओडो (Noble Skiodo) या कंपनीने 10 हजारपेक्षा कमी किंमतीचा स्मार्ट एलईडी टीव्ही भारतात लाँच केला आहे.
नोबेल स्किओडोचा 8999 रुपयांत 32 इंच एलईडी टीव्ही
नोबेल स्किओडो या कंपनीने लाँच केलेल्या 24 इंच टीव्हीची किंमत फक्त 6 हजार 999 रुपये आहे. तर 32 इंच टीव्हीची किंमत 8 हजार 999 रुपये आहे. या टीव्हीमध्ये एलईडी टीव्ही स्मार्ट कनेक्टिव्हिटी, व्हायफाय आणि शेअरींग या सर्व सुविधा दिल्या आहेत. त्याचबरोबर यात यूट्यूब, युट्यूब, मिराकास्ट, वेब ब्राऊजर, ट्विटर यांसारखे विविध फिचरही आधीच इन्स्टॉल आहेत. विशेष म्हणजे या टीव्हीत moisturizer damage protection देण्यात आले आहे. त्याशिवाय या टीव्हीमध्ये Customized backlight setting असल्याने वीजेची बचत होणार आहे. हे दोन्ही एलईडी टीव्ही 1280×720 रिजॉल्युशनचे आहेत. या टीव्हीचे स्पीकर साऊंड क्वॉलिटी 20 वॅट साऊंड देते. तसेच यात HDMI आणि USB पोर्ट देण्यात आला आहे. ग्राहकांना हा टीव्ही येत्या 1 एप्रिलपासून ऑनलाईन खरेदी करता येणार आहे.