एक एप्रिलपासून संपावर जाणार जेट एअरवेजचे पायलट

Jet-Airways
मुंबई: एक एप्रिलपासून संपावर जाण्याच्या तयारीत कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या जेट एअरवेजचे 1,000 हुन अधिक पायलट असून अनेक दिवसांपासून जेटच्या पायलटचे पगार थकलेले आहेत. पायलटच्या संघटनेने या पार्श्वभूमीवर याआधीही कंपनीला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. पायलटचे थकीत वेतन देण्यात आले नाही तसेच 31 मार्चपर्यंत यातून मार्ग काढण्यात आला नाहीतर 1 एप्रिलपासून संपावर जाण्याचा इशारा नॅशनल एव्हिएटर्स गिल्ड (एनएजी) या पायलटच्या संघटनेने मागील आठवड्यात दिला होता.

पण आता कर्ज देणाऱ्या बॅंकांचे नियंत्रण कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या जेटच्या मॅनेजमेंटवर आहे. आता जेट एअरवेजचे व्यवस्थापन स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बॅंकांच्या गटाने आपल्या ताब्यात घेतले आहे. 29 मार्चपर्यत एसबीआयकडून पतपुरवठा होण्याची अपेक्षा होती. पण हा पतपुरवठा अजूनही न झाल्यामुळे जेटचे व्यवस्थापन पायलटचा पगार देऊ शकलेले नाही. मुंबई आणि दिल्ली येथील पायलटनी संयुक्तपणे एक एप्रिलपासून संपावर जाण्याच निर्णय घेतला आहे.

Leave a Comment