जुळ्या मुलांचे दोन बाप, डीएनएच्या अहवालानंतर पतीला बसला धक्का

twin
चीनमधील शियामेन शहरातील एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. पण त्यानंतर केलेल्या डीएनए टेस्टमध्ये असे समोर आले की, या मुलांचे बाप वेगवेगळे आहेत. बाळांच्या बर्थ रजिस्ट्रेशनसाठी जेव्हा पॅटर्निटी टेस्ट केली गेली, तेव्हा तो रिपोर्ट पाहून मुलांच्या बापला धक्काच बसला.

डीएनए टेस्टमध्ये दोघांचाही डीएनए वेगवेगळा आढळला आहे. दोन्ही मुलांचे बाप वेगवेगळे होते. याबाबत पतीने महिलेकडे विचारपूस केली असता तिने मान्य केले की, आपल्या पतीसोबत तिने विश्वासघात केला. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, बाळांच्या जन्मानंतर त्यांचे रजिस्ट्रेशन पोलीस स्टेशनमध्ये करायचे असते. जोडप्याला रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यासाठी पुरावा म्हणून पॅटर्निटी टेस्टचा रिपोर्ट द्यायचा होता. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले.

स्थानिक मीडियात रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, मुलांचे पिता शियाओलोंग सुरूवातीपासून एका बाळाबाबत शंका घेत होते. कारण त्याचा चेहरा वेगळा वाटत होता. पण जेव्हा डीएनए टेस्टचा रिपोर्ट समोर आला तेव्हा त्याला धक्का बसला. हे प्रकरण नेमके काय आहे हे जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा पॅटर्निटी टेस्ट करण्यात आली.

जोडप्याची पॅटर्निटी टेस्ट करणाऱ्या फुजियान झेंगतई फॉरेन्सिक आयडेंटिफिकेशन सेंटरच्या निर्देशकांनी सांगितले की, दोनपैकी एका बाळाचा डीएनए पिता शियाओलोंगसोबत मॅच झाला नाही. निर्देशक झांग यांनी सांगितले की, शियाओलोंग रिपोर्ट पाहताच चांगलाच संतापला होता आणि पत्नीसोबत भांडू लागला होता. सुरूवातीला तिने त्याला काहीच सांगितले नाही.

शियाओलोंग याबाबत जेव्हा पत्नीला विचारपूस करत होता तेव्हा पतीवर रिपोर्टसोबत छेडछाड केल्याचा महिलेने आरोप लावला. पण काहीवेळाने सत्य समोर आले. एका अनोळखी व्यक्तीसोबत महिलेने रात्र घालवल्याची बाब तिने मान्य केली. तिने हे सांगितले की, तिने दुसऱ्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. यानंतर मुलांचा पिता शियाओलोंग याचे म्हणणे आहे की, दोन्ही मुलांचे पालन पोषण करायला आपण तयार आहे. पण दुसऱ्याच्या मुलाला तो त्याचे नाव देणार नाही. पण हे प्रकरण आता पती-पत्नीने आपसात सोडवले आहे.

Leave a Comment