कबीर खानच्या ’83’मध्ये आदिनाथ कोठारे साकारणार वेंगसरकर

aadinath-kothare
२५ जून १९८३ या दिवशी भारतीय संघाने लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर क्रिकेट विश्वचषक जिंकल्यामुळे भारताच्या इतिहासामध्ये ही तारीख सुवर्ण अक्षरात कोरली गेली आहे. आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला याच क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित ‘83’ हा चित्रपट येणार आहे. अभिनेता रणवीर सिंह या चित्रपटामध्ये तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार असून या चित्रपटातील काही भूमिकांवरील पडदा आतापर्यत दूर करण्यात आला आहे.

आता या चित्रपटामध्ये आणखी एक मराठमोळा चेहरा झळकणार आहे. यापूर्वी या चित्रपटात संदीप पाटील यांचा मुलगा चिराग पाटील झळकणार असून आता या चित्रपटात आदिनाथ कोठारेही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात आदिनाथ झळकणार असल्याचे समजल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे.

आदिनाथ कोठारेने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले असून त्याची गणना आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये होते. केवळ अभिनेता म्हणूनच नाही, तर दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही त्याची स्वतंत्र ओळख आहे. आदिनाथने आता त्याचा मोर्चा बॉलिवूडकडे वळविला असून लवकरच ’83’ या बॉलिवूड चित्रपटात आदिनाथ झळकणार आहे. आदिनाथ कबीर खान दिग्दर्शित ’83’ मध्ये पूर्व भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आदिनाथ सुरुवात करणार असून या चित्रपटात काम करण्यासाठी तो खूपच उत्सुक आहे.

Leave a Comment