रॉबर्ट कॉर्नीच्या गिनीज बुक रेकॉर्ड ला मिळाले आव्हान

robert
अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटी मध्ये जगातील सर्वाधिक उंचीचा राजकारण क्षेत्रातील व्यक्ती म्हणून रॉबर्ट कॉर्नी या ६ फुट १० इंच उंचीच्या कौन्सिलला बुधवारी सन्मान प्रदान केला गेला खरा पण त्याच्या या रेकॉर्डला ताबडतोब आव्हान मिळाले आहे. गिनीज बुकने रॉबर्ट कॉर्नीची राजकीय क्षेत्रातील सर्वात उंच व्यक्ती अशी नोंद करून तसे प्रमाणपत्र रॉबर्ट कॉर्नीला दिले आहे.

या बाबत रॉबर्ट कॉर्नीचे म्हणणे असे होते कि खरेतर तो दोन वर्षापूर्वीच या संदर्भातला अर्ज गिनीज बुक कडे करणार होता मात्र लोक चेष्टा करतील या भीतीने त्याने तसा अर्ज केला नाही. या पूर्वी हे रेकॉर्ड ब्रिटीश खासदार लुइस गाल्स्टीन याच्या नावावर होते. त्याची उंची ६ फुट ७ इंच होती. रॉबर्ट कॉर्नीची मुलाखत घेण्यासाठी आलेली पत्रकार खुर्चीवर उभी राहून त्याची मुलाखत घेत होती.

मात्र रॉबर्ट कॉर्नीच्या या दाव्याला त्वरित आव्हान मिळाले कारण जॉन गोद्फ्रेड हा माजी बास्केटबॉल खेळाडू ६ फुट साडेअकरा इंच उंचीचा असून तो विमा कमिशनर आहे तसेच ओहिओ स्टेटचा माजी मेयर सात फुट उंच असून त्याने या टायटल साठी दावा करणार असल्याचे जाहीर केले आहे. याचबरोबर चायना पीपल्स पार्टीचा सल्लागार आणि माजी बास्केटबॉलपटू याओ मिंग याने त्याची उंची ७ फुट ६ इंच असल्याचे जाहीर केले आहे. या सर्व लोकांमुळे रॉबर्ट कॉर्नीच्या जगातील सर्वात उंच राजकीय क्षेत्रातील व्यक्ती या रेकॉर्ड बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Leave a Comment