जगभरात इडली खाण्यात बंगलोरवासी आघाडीवर

mini
३० मार्च हा दिवस भारतात इडली डे म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने उबेर इट्सने नुकतेच एक सर्व्हेक्षण केले असून भारतात कोणत्या शहरात इडली सर्वाधिक प्रमाणात खाल्ली जाते याची आकडेवारी जमा केली आहे. अर्थात ही आकडेवारी उबेर इट्सकडे नोंदविल्या गेलेल्या ऑर्डरवरून काढली गेलेली आहे. त्यानुसार बंगलोर शहरात इडली सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे दिसून आले आहे. त्याखालोखाल मुंबई, चेन्नई, पुणे आणि हैद्राबाद या शहराचा नंबर लागला आहे.

thatte
उबेरचे सर्व्हेक्षण सांगते त्यानुसार इडली हा प्रकार नाश्ता म्हणून सर्वाधिक मागणी असलेला पदार्थ असून केवळ भारतातच नाही तर परदेशातही इडली डिमांड मध्ये आहे. सॅन फ्रान्सिस्को, लंडन, न्यू जर्सी या शहरातही इडलीचे भोक्ते मोठ्या प्रमाणावर आहेत. इडलीला सर्वाधिक मागणी सकाळच्या वेळात तीही सकाळी साडेसात ते साडेअकरा या वेळात आहे. उबेरच्या आकडेवारीनुसार १० मार्च रोजी भारतात सर्वाधिक इडली डिलिव्हरी दिल्या गेल्या. यासाठी गेल्या सहा महिन्यातील इडली डिमांड लक्षात घेऊन हे विश्लेषण केले गेले. भारतीय इडली बरोबर सांबर आणि चटणी यांना अधिक प्राधान्य देतात असेही यात दिसून आले. मात्र लाइम सोडा सोबत इडली खाणारे तसेच मसाला लस्सी आणि जलजीरा सोबत इडली चेपणारेही अनेक आहेत असे उबेर कडे आलेल्या ऑर्डरवरून दिसले.

fried
इडली हा हेल्दी पदार्थ म्हणून मान्यता पावलेला आहेच पण अनेक प्रकाराने ती बनविता येते. कमी तेल, उडीद डाळ असल्याने चांगल्या प्रकारची आणि पुरेशी प्रथिने, तांदळामुळे आवश्यक कर्बोदके आणि फायबर शिवाय पचनास हलकी आणि विविध व्हरायटी मध्ये मिळणारी यामुळे इडली लोकप्रिय आहे यात विशेष नाही. सर्वाधिक प्रमाणात इडली खाणाऱ्या बंगलोर मध्ये थाटे इडली अधिक पसंत केली जाते तर चेन्नई मध्ये राईस इडली आवडता प्रकार आहे. हैद्राबाद मध्ये मसाला इडली, कोची मध्ये पेपर ग्रे इडली, कोलकाता येथे फ्राईड इडली तर मुंबई सारख्या शहरात मसाला इडली अधिक लोकप्रिय आहे.

idly
इडली बनविणे सोपे आहे आणि विविध प्रकारच्या भाज्या आणि मसाले घालून तिच्या चवीत विविधता आणता येते. लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तीपर्यंत तसेच आजारी व्यक्ती इडली सहज पचवू शकतात आणि हेल्थ कॉन्शस लोकांसाठी त्यात कमी कॅलरी असणे हे इडली खाण्यामागे मुख्य कारण आहे.

Leave a Comment