ग्रीष्मात डोळ्यांना सुखाविणारी सुंदर, सुकोमल फुले

magno
वसंताचे आगमन म्हणजे फुलांचा बहर असे समीकरण आहे. मात्र वसंतपाठोपाठ येणारा आणि उन्हाची काहिली सोसायला लावणारा ग्रीष्म ऋतू डोळ्यांसाठी जणू मेजवानी देणारा असतो. या काळात अनेक प्रकारची फुले फुलतात आणि सृष्टीवर रंगांची उधळण करतात. ही फुलांची दुनिया इतकी विशाल आणि विविध आहे कि एका जन्मात ती अनुभवणे अवघड आहे कारण ही सुकुमार, सुगंधी आणि बहुरंगी फुले जगभरात फुलत असतात. नुसत्या डोळ्यांनी या फुलांच्या सौंदर्याचे निरीक्षण करणे हा किती मोठा आनंदाचा ठेवा आहे हे प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट आहे.

Untitled-1
जगात किती प्रकारची फुले फुलतात हे सांगणे कठीण आहे. मात्र त्यातील वेगळी आणि अनोखी फुले नक्कीच शोधता येतात. अशाच काही अनोख्या फुलांची माहिती येथे देण्याचा हा प्रयत्न आहे. सध्या आशियाई देशात तापमान वाढत चालले आहे म्हणजे उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. चीन मध्ये राजधानी बीजिंग येथे मॅग्नोलियाचा बहार आला आहे. मॅग्नोलिया या झाडाचे ३२ हून अधिक प्रकार आहेत आणि त्यांना येणारी फुले वेगवेगळ्या आकाराची आहे. बीजिंग मध्ये फुललेली गुलाबी रंगाची फुले पक्षांचा भास निर्माण करत असून झाडाची पाने सारून हा बहार आला आहे.

paradise
बर्ड ऑफ पॅराडाइज नावाने ओळखली जाणारी फुले ट्रॉपिकल भागात अधिक येतात. हे फुले म्हणजे जणू उडणारा पक्षीच. थंड प्रदेशात राहणारे या झाडांची लागवड करू शकतात फक्त ती घरात उबदार जागेत वाढवावी लागतात.

white-igret
व्हाईट इग्रेट ऑर्किड या जातीची फुले अतिशय नाजूक आहेत. पूर्ण पंख पसरवून गगनात झेप घेण्याचा तयारीत असलेल्या व्हाईट इग्रेट या पक्षाची आठवण ती करून देतात. हे फुल जंगली आहे आणि आशिया भागात अधिक प्रमाणात दिसते. तसे युएस मध्येही ते दिसते. एकेका डहाळीवर २ ते १० फुले येतात आणि पक्ष्याचा कळप बसावा तशी दिसतात.

parrot
पॅरट फ्लॉवर हे थायलंड मधील खास फुल. ते आता नामशेष होत असलेल्या जातीत समाविष्ट केले गेले आहे त्यामुळे या थायलंड बाहेर ते नेता येत नाही. एका बाजूने पाहताना ते अगदी पोपटासारखे दिसते. अथवा उडणारया कोकीळाचा भास निर्माण करते. या पक्ष्याचे फोटो सुरवातीला व्हायरल झाले तेव्हा ते खोटे किंवा फोटोशॉप्ड असल्याचे दावे केले गेले कारण फारच थोड्या लोकांनी हे फुल प्रत्यक्ष पाहिलेले आहे.

Leave a Comment