तीस दिवसात दोनदा झाली या महिलेची प्रसुती

delivery
बांगलादेशात एक विचित्रच घटना घडली आहे. तिथे एका महिलेने 30 दिवसात 3 बाळांना जन्म दिला आहे. या घटनेमुळे डॉक्टरदेखील चक्रावून गेले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेशामधील या 20 वर्षीय महिलने सर्वात आधी एका बाळाला जन्म दिला त्यानंतर 26 दिवसांनंतर जुळ्या मुलांना जन्म दिला. पण घटनेमुळे डॉक्टर मात्र हैराण झाले आहेत कि पहिल्या बाळाच्या जन्मावेळी त्यांना हे कळालेच नाही की, तिच्या पोटात जुळे आहेत.

यासंदर्भातील वृत्त बीबीसीने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार या महिलेचे नाव आरिफा सुल्तान असून 26 दिवसांपूर्वी तिने एका मुलाला जन्म दिला होता. तिची प्रसुती नॉर्मल झाली होती. याबाबत माहिती देताना आरिफाच्या डॉक्टर डॉ. शीला पोद्दार यांनी सांगितले की, पहिल्या प्रसुतीच्यावेळी आम्हाला तिच्या पोटातील जुळ्या बाळांबाबत काहीच कळू शकले नाही. जेव्हा पोटात दुखण्याची तक्रार करत ती पुन्हा आली तेव्हा आम्ही तिची अल्ट्रासोनोग्राफी केली असता ज्यात समोर आले की, तिच्या पोटात दोन गर्भाशय आहेत.

पहिली डिलिव्हरी नॉर्मल झाली होती. पण यावेळी डॉक्टरांनी ऑपरेशनचा निर्णय घेतला. त्यानंतर आरिफाने जुळ्या बाळांना जन्म दिला. त्यात एक मुलगी आणि मुलगा आहे. आरिफा तिच्या तिन्ही बाळांसोबत सुखरूप आहेत. सरकारी डॉक्टर दिलीप रॉय यांनी यावर सांगितले की, त्यांनी त्यांच्या ३० वर्षांच्या करिअरमध्ये अशी केस कधी पाहिली नाही. या सर्व घटनेवर आरिफाचा पती सुमोन म्हणाला की, मोलमजूरी करून मी महिन्याला केवळ ६ हजार टका(बांग्लादेशी करन्सी) कमावतो. मला आत्ताच नाही माहीत की, एवढ्या कमी पैशात आम्ही कसे घर चालवू, पण माझा हा प्रयत्न राहील की, मी सर्वांना खूश ठेवेल.

Leave a Comment