गोपाळ शेट्टींविरोधात निवडणूक लढवणार उर्मिला मातोंडकर

urmila-matondkar
मुंबई – अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यावेळीच तिला उमेदवारी भेटेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार काँग्रेसने उत्तर मुंबई मतदारसंघातून उर्मिला मातोंडकरला उमेदवारी दिली आहे. भाजपच्या गोपाळ शेट्टींविरोधात उर्मिला मातोंडकरचा सामना असणार आहे.

उर्मिला मातोंडकरने बुधवारी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला, मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याआधी उर्मिलाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. आपण निवडणुकासाठी पक्षात प्रवेश करत नसल्याचे तिने पक्षात प्रवेश करताना म्हटले होते. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी राजकारणात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या काँग्रेस प्रवेशाकडे त्याच दृष्टीकोनातून पाहू नका. काँग्रेसमध्ये मी निवडणूक लढण्यासाठी प्रवेश केलेला नाही. मी निवडणुकीनंतरही काँग्रेससोबतच राहणार असल्याचे तिने म्हटले होते.

Leave a Comment