मेट्रोच्या कामादरम्यान स्वारगेटजवळ सापडली दोन भुयारे

swargate
पुणे – पुणे शहरातील स्वारगेट भागात मेट्रोच्या कामासाठी सुरु असलेल्या खोदकामांदरम्यान दोन भुयारी मार्ग आढळून आले आहेत. अद्यापपर्यंत या भुयारांची माहिती उपलब्ध नसल्यामुळे ही भुयारे किती जुनी आहेत हे कळू शकलेले नाहीत.

सध्या पुण्यातील स्वारगेट ते अॅग्रीकल्चर कॉलेज या मार्गावरील मेट्रोच्या भुयारी मार्गाचे काम सुरु आहे. दरम्यान, स्वारगेटला मल्टीमोड हब उभारण्यात येत असल्याने त्यासाठी पायलिंग मशीनच्या सहाय्याने खोदकाम सुरु आहे. जमिनीखाली सुमारे १५ फुटांवर हा भुयारी मार्ग हे काम सुरु असताना आढळून आला आहे. पूर्व-पश्चिम दिशेकडे जाणारे असे हे भुयार असून उत्तर दिशेलाही एक भुयार जाते.

दगडी बांधकाम केलेल्या पक्क्या स्थितीत ही भुयारे आहे. या भुयारांची लांबी ५० ते ६० मीटर एवढी आहे. ही भुयारे कधी बांधली असतील याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पण ते ३० ते ३५ वर्षे जुने असावे असे अभियंत्यांकडून सांगण्यात येत आहे. पण यामुळे मेट्रोचे काम थांबवण्यात आले आहे.

Leave a Comment