पुण्यात सुरेखा पुणेकर विरूद्ध गिरीश बापट असा सामना रंगण्याची शक्यता

surekha-punekar
पुणे – गिरीश बापट यांना लोकसभेसाठी भाजपने पुण्यातून उमेदवारी दिली आहे. पण त्यांच्या विरोधात कुणाला उभे करायचे यासंदर्भात काँग्रेसच्या गोटात सुरु असलेला घोळ अद्याप संपलेला नाही. त्यातच लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या पुण्यातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे या जागेवरून लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या नावाचा विचार होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर खुद्द सुरेखा पुणेकर यांनी देखील यासंदर्भातील संकेत दिले आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी सुरेखा पुणेकर यांना काँग्रेसने तिकिट दिल्यास पुण्यात सुरेखा पुणेकर विरूद्ध गिरीश बापट असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

सुरेखा पुणेकर यांनीच हा खुलासा एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे. मी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या नेत्यांशी बोलले आहे. मला त्यांचा निर्णय ते कळवणार आहे. कुणाला भेटले ते मी काही सांगणार नाही असेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचे नाव निश्चित झाल्याची कालपर्यंत चर्चा होती. पण आता सुरेखा पुणेकर पुण्यातून काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काँग्रेसने पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे यांचे नाव निश्चित केले आहे पण त्याची अद्याप अधिकृत घोषणा अजुन झालेली नाही. काँग्रेसचा उमेदवार कोण याचीच चर्चा गेली काही दिवस सुरू होती. दिल्लीतील श्रेष्ठींनी आपले मत शिंदे यांच्या पारड्यात टाकल्याने त्यांची उमेदवारी पक्की झाली अशी माहिती सूत्रांनी दिली होती.

Leave a Comment