या हॉलीवुड स्टारचे अवघ्या चार दिवसात तुटले चौथे लग्न

Nicolas-Cage
न्यूयॉर्क – हॉलिवूडचा सुपरस्टार निकोलस केजच्या खासगी आयुष्यात एकामागून एक संकटे येत आहेत. काही दिवसांपूर्वी मेकअप आर्टिस्ट एरिका कोइकशी निकोलसने लग्न केले होते. पण एक धक्कादायक बातमी लग्नाच्या काही दिवसांनंतर समोर आली. असे म्हटले जाते की, दोघांनी फक्त चार दिवसांमध्ये एकमेकांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचे चाहते लग्न मोडण्याचे कारण सोशल मीडियावर विचारत आहेत.

निकोलस आणि एरिकापैकी एकानेही एवढ्या लवकर लग्न मोडण्याच्या बातमीवर अजूनपर्यंत स्पष्टीकरण दिले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार बुधवारी लग्न मोडण्याचा निर्णय ५५ वर्षीय निकोलस केजने घेतला. असे म्हटले जाते की, दोघांनी मॅरेज सर्टिफिकेटची शनिवारी मागणी केली होती आणि त्याच दिवशी त्यांना लायसन्सही मिळाले होते.

या दोघांच्या प्रतिनिधींपैकी एकानेही चार दिवसांमध्ये कोणत्याच प्रकारचे उत्तर दिले नाही. निकोलस आणि एरिकाने त्यांचे नाते फार कोणाला कळू दिले नव्हते. दोघे लग्नाआधी अनेकदा एकत्र दिसले होते पण आपले नाते कधीच त्यांनी मान्य केले नव्हते. दोघांनी लग्नानंतर सर्वांसमोर आपले नाते मान्य केले. पण आता हे लग्न अवघ्या चार दिवसांमध्येच मोडत आहे.

आतापर्यंत निकोलस केजची तीन लग्न झाली आहेत. त्याचे एरिकासोबतचे हे चौथे लग्न होते. १९९५ मध्ये निकोलसने पहिले लग्न अभिनेत्री पेट्रीसिया अर्क्वेटशी केले होते. पण त्यांचा २००१ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर त्याने २००२ मध्ये लीजा मारीशी दुसरे लग्न केले. फार काळ हे लग्नही टीकू शकले नाही. दोघांनी २००४ मध्ये घटस्फोटाचा निर्णय घेतला. यानंतर निकोलसने एलिस किनशी तिसरे लग्न केले. १२ वर्ष दोघांचे हे लग्न टिकले आणि पहिल्या दोन लग्नाप्रमाणे निकोलसने २०१६ मध्ये एलिसला घटस्फोट दिला. निकोलस केजला २८ वर्षांची एक मुलगी आहे.

Leave a Comment