हौशेला मोल नाही; जलपरी बनण्यासाठी खर्च केले तब्बल लाखो रुपये

marmaid
आपल्याकडे हौशेला मोल नसते अशा आशयाची म्हण प्रचलित आहे. पण आपली हीच हौस पुर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील दोन तरुणींनी चक्क लाखो रुपये खर्च केले आहेत. जलपरीच्या अनेक गोष्टी आपल्या लहानपणी ऐकलेल्या आहेत. पण खरंच प्रत्यक्षात जलपरी अस्तित्वात असतात की नाही हे सांगणे थोडे अवघडच आहे. पण ऑस्ट्रेलियातील दोन तरुणी चक्क जलपरी झाल्या आहेत. या दोघींनीही एखाद्या गोष्टीची हौस माणसांना काहीही करायला भाग पाडते हे सिद्ध करून दाखवले आहे. जलपरींबाबत ऑस्ट्रेलियातील जेसिका बेल आणि अमेलिया लासेटर या दोन्ही तरुणींना प्रचंड आकर्षण असल्याने त्या जलपरी झाल्या आहेत.
marmaid1
त्यांना कार्टूनमध्ये नेहमी असणारी जलपरी एवढी आवडली की खऱ्या आयुष्यात त्यांनी जलपरी होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. ऑस्ट्रेलियातील समुद्रात जलपरी होऊन त्या शार्कसोबत पोहण्याचा आनंद घेतात. जलपरी होण्यासाठी जेसिका बेल आणि अमेलिया लासेटर या दोघींनी लाखो रुपये खर्च केले आहेत. एक लाखाची सिलिकॉनपासून तयार करण्यात आलेली माशासारखी शेपटी त्यांनी लावली आहे.
marmaid2
जेसिकाने समुद्रावर खूप जास्त प्रेम असल्याने अशापद्धतीने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. जेसिकाची अमेलिया ही खास मैत्रीण असून तिची आवड आपल्यासारखीच असल्याचे जेसिकाने म्हटले आहे. तसेच लहान मुले यांना पोहताना पाहिल्यावर जलपरीच म्हणतात.
marmaid3
जेसिका आणि अमेलिया यांची फोटोग्राफीचे शिक्षण घेत असताना चांगली मैत्री झाली. अमेलियाला 2011 मध्ये एका बीच फोटोशूटसाठी निवडण्यात आले त्यामध्ये ती जलपरी झाली होती. जलपरी म्हणून जेसिका आणि अमेलिया या दोघींनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जलपरी होऊन अनेक बर्थ डे पार्टीमध्ये या दोघी परफॉर्म करतात. तसेच लहान मुलांना पोहण्याचे प्रशिक्षण देतात.

Leave a Comment