मागील पाचवर्षात हेमामालिनींच्या संपत्तीत 34 कोटींची वाढ

hema-malini
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या खासदार ड्रीमगर्ल हेमामालिनी यांनी मथुरा येथून आपला उमेदवारी अर्ज भरला. नावाची नोंदणी करतानाचे फोटो हेमा मालिनी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले.

त्यांनी २०१४ मध्ये राजकारणात प्रवेश केला. कोट्यवधी लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या हेमा मालिनी या अब्जाधीश आहेत, याचा खुलासा त्यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल करताना झाला. हेमा मालिनी यांनी अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत वृंदावनस्थित बांकेबिहारी मंदिरात पूजा केली.

हेमा मालिनी यांनी भरलेल्या अर्जानुसार, त्यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत 34 कोटी 46 लाख रुपयांची वाढ झाली आहे. तर त्यांचे पती धर्मेंद्र देओल यांच्या संपत्तीत 12 कोटी 30 लाख रुपयांची वाढ झाली. गेल्या पाच वर्षांत हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी आयकर विभागात दाखल केलेल्या रिटर्न्सनुसार हेमा मालिनी यांनी २०१३-१४ मध्ये जिकडे १५ लाख ९३ हजार रुपये कमवले तर २०१७-१८ मध्ये १ कोटी १९ लाख रुपये कमावल्याची घोषणा कर विभागाकडे केली.

त्यांनी २०१४-१५ मध्ये ३ कोटी १२ लाख रुपये, २०१५-१६ मध्ये १ कोटी ९ लाख रुपये आणि २०१६-१७ मध्ये ४ कोटी ३० लाख रुपये कमवले. हेमा मालिनी यांची या पाच वर्षांच्या काळात एकूण संपत्ती ९ कोटी ८७ लाख ५५ हजार रुपये आहे तर धर्मेंद्र यांची संपत्ती ९ कोटी ७२ लाख ७८ हजार रुपये आहे. हेमा मालिनी यांच्याकडे दोन गाड्या असून एक मर्सिडीज आहे जी त्यांनी २०११ मध्ये ३३ लाख ६२ हजार रुपयांना विकत घेतली होती. याशिवाय २००५ मध्ये त्यांनी टोयोटाची गाडी ४.७५ लाखांना विकत घेतली होती.

निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जानुसार धर्मेंद्र यांच्याकडे १९६५ मध्ये विकत घेतलेली गाडी आहे. त्यावेळी ही कार सात हजार रुपयांना त्यांनी विकत घेतली होती. याशिवाय रेंज रोव्हर गाडी आणि मारुती ८०० आणि जुन्या गाड्यांमध्ये एका बाइकचा समावेश आहे. धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती १२३ कोटी ८५ लाख १२ हजार १३६ रुपये आहे.

हेमा मालिनी या १ अब्ज १ कोटी ९५ लाख रोख रक्कम, दागिने, फिक्स डिपॉझिट, शेअर्स आणि बंगल्याची मालकीन आहेत. हेमामालिनी यांच्यावर ६ कोटी ७५ लाख आणि धर्मेंद्र यांच्यावर ७ कोटी ३७ लाख रुपयांचं कर्जही आहे. या कर्जातला मोठा भाग हा जुहू येथे बंगला तयार करण्यासाठी घेतलं होतं. या बंगल्याचा त्यांना फायदाही झाला आहे. जमिनीची किंमत आणि मूळ बंगला ५८ कोटी रुपयांचा होता जो आता वाढून १ अब्ज एवढा झाला आहे.

Leave a Comment