मी कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवणार नाही – माधुरी दीक्षित

madhuri-dixit
नवी दिल्ली : अनेक बॉलिवूड कलाकारांनी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर राजकारणात नवी इंनिंग सुरू केली आहे. राजकीय पक्षात अनेक कलाकारांनी प्रवेश केला आहे. त्यातच आता राजकारणात बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितही येणार असल्याची चर्चा होती. परंतु आपण कोणत्याही पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे माधुरीने स्पष्ट केले आहे.

भाजपकडून पुण्यातून माधुरी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात होते, पण माधुरीने कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडली नसल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ही केवळ अफवा आहे. कोणत्याही राजकीय पक्षाकडून मी निवडणूक लढवणार नाही. याआधीही मी याबबात माझे विचार स्पष्ट केले होते. मला वाटते बॉलिवूडमधून आमच्या तीन जणांबाबत अशाप्रकारची अफवा पसरवण्यात आली होती आणि याविषयी मी आधीच माझे विचार स्पष्ट केले असल्याचे, माधुरीने म्हटले आहे.

Leave a Comment