1 एप्रिलपासून ‘या’ गोष्टी स्वस्त आणि महाग होणार

GST
नवी दिल्ली : नव्या आर्थिक वर्षाला एक एप्रिलपासून सुरुवात होते. सर्वसामान्यांना यंदा नवीन आर्थिक वर्षात मोठा दिलासा मिळणार आहे. जीएसटी परिषदेत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी निवडणुकांच्या तोंडावर 1 एप्रिलपासून होणार आहे. हे वर्ष सर्वसामान्य, छोटे व्यापाऱ्यांना दिलासा देणार असणार आहे.

घर खरेदी करणे 1 एप्रिल 2019 पासून स्वस्त होणार. जीएसटीच्या नव्या नियमानुसार निर्माणाधिन दुकानांवरील टॅक्स स्लॅब 12 वरुन 5 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. स्वस्त घरांवरील जीएसटी 8 वरुन 1 टक्के केला आहे. सीमेंट वगळता बाकी वस्तुंवरील जीएसटी स्लॅब कमी केला आहे. घर खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकणार आहे.

जीवन विमा स्वस्त होणार असून विमा कंपन्यांना जीएसटीच्या नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. विमा कंपन्या आतापर्यंत 2006-08 चा डेटा वापरत होते मात्र 1 एप्रिलपासून विमा कंपन्यांना नव्या डेटाचा आधार घ्यावा लागणार आहे. जो 2012-2014 साली तयार करण्यात आला होता.

तुम्ही जर रेल्वेचे तिकीट काढले असेल आणि तुमची काही कारणांनी ट्रेन चुकली तर तुमचे तिकीट तुम्हाला रिफंड मिळू शकते किंवा तुम्ही दुसरे तिकीट काढून दोन पीएनआर एकत्र लिंक करु शकता. दोन तिकीटांसाठी संयुक्त पीएनआर नंबर दिला जाईल. ज्यामध्ये एक ट्रेन सुटली तर दुसऱ्या ट्रेनमधून तुम्ही प्रवास करू शकता. नोकरी बदलल्यावर आता तुम्हाला ईपीएफओसाठी अर्ज करावा लागणार नाही. तुमचा ईपीएफओ तुमच्या नवीन कंपनीत डायरेक्ट ट्रान्सफर करता येणार

बँकेत लोन घेणे 1 एप्रिलपासून स्वस्त होणार आहे. आता तुम्ही घेतलेल्या कर्जावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार रेपो रेट लावला जाणार आहे. रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट घटल्यास व्याजदरातही कपात होणार आहे. व्याजदर वाढवणे किंवा कमी करणे आता बँकेच्या हातात राहणार नाही. रिझर्व्ह बँकेची बँकेच्या व्याजदरांवर नजर राहणार आहे.

1 एप्रिलपासून कार खरेदी करणे महाग होणार आहे. टाटा मोटर्स, रेनॉल्ट इंडिया, जगुआर लैंड रोवर इंडिया (जेएलआर), महिंद्रा एंड महिंद्रा, टोयोटा मोटर्स कार बनवणाऱ्या वस्तुंवरील किंमतीत वाढ करणार आहेत. 1 एप्रिलपासून कारचे पार्ट महाग झाल्याने कारची किंमत वाढणार असल्यामुळे कार खरेदीत तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे.

18 टक्क्यांनी सीएनजी गॅसच्या किमती वाढल्यामुळे तुमच्या खिसा लवकर रिकामा होऊ शकतो. त्यामुळे पेट्रोल-डिझेलसोबत आता सीएनजी गॅसची किंमतही वाढणार आहे. 1 एप्रिलपासून पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करणाऱ्या सर्व सोसायटी अथवा कॉम्प्लेक्समधील गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Comment