पुढच्या महिन्यापासून सोशल मीडियावर दाखवू नका तुमच्या श्रीमंतीचा थाट

social-media
काही लोक आपली श्रीमंती दाखवण्यासाठी सोशल मीडियाचा सर्रास वापर करतात आणि ते काही नवीन नाही. पण यापुढे तुम्ही तुमच्या श्रीमंतीचा थाट सोशल मीडियावर शो ऑफ केले तर आयकर विभागाचे अधिकारी नक्कीच तुमच्या घरी पोहचले म्हणून समजा. कारण 1 एप्रिलपासून आयकर विभाग प्रोजेक्ट इनसाइट (Project Insight) लागू करत आहे. त्यानुसार यानुसार सोशल मीडिया अकाऊंटवर नजर ठेवली जाणार आहे.
social-media1
एखादा श्रीमंती दाखवणारा फोटो जर तुम्ही शेअर केला तर आयकर विभागाचे अधिकारी तुमच्या बँक खात्याची चौकशी करेल. त्यात जर काही काळबेरे आढळले, तर तुमच्यावर लगेच कारवाई होईल. गेल्या वर्षापासून प्रोजेक्ट इनसाइट सुरू होणार होता. पण तो आता 1 एप्रिलपासून लागू होत आहे. अनेकदा लोक महागड्या वस्तू खरेदीची माहिती आयकर विभागाला देत नाहीत. त्यासाठीच आता सोशल मीडियावर लक्ष ठेवले जाणार आहे.
social-media2
आयकर विभागाने यासाठी एलएंडटी कंपनीची मदत घेतली आहे. एक व्हर्च्युअल हाऊस बनवले आहे त्याद्वारे लोकांची सोशल मीडियावरची अकाऊंट्स आणि बँक खाती जोडली गेली आहे. 1 हजार कोटी या प्रोजेक्टसाठी खर्च करण्यात आले आहेत. हा प्रोजेक्ट गेली 7 वर्ष बनत होता. यामागे सरकारचा असा उद्देश हा आहे की या प्रोजेक्टद्वारे जगातला सर्वात मोठा बायोमेट्रिक डेटाबेस तयार करायचा. यामुळे आयकर विभागाला आयकर वाचवणाऱ्यांची माहिती मिळू शकते. त्यांचे असे म्हणणे आहे की सगळे जण खरी माहिती देत नाहीत. उलट सोशल मीडियावर आपण काय खरेदी केले, कुठे फिरायला गेलो हे पोस्ट करतात.

Leave a Comment