भाजप आमदाराला ‘चौकीदार’ शब्द वापरणे पडले महागात

bjp
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र सिंह मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर मी चौकीदार आहे आणि आम्हीपण चौकीदार आहोत असे लिहिल्यानंतर देशभरात चौकीदार मोहिम सुरु झाली. मोदींच्या सर्व समर्थकांनी ट्विटरच्या अकाउंटवरील नावाच्या पुढे चौकीदार लिहिण्यास सुरुवात केली. परंतु हा शब्द आता ट्विटर अकांऊटवरुन निघुन गाड्यांच्या नंबर प्लेटवर पोहचला आहे.

तथापि, भारतीय कायद्यानुसार कोणत्याही वाहनाच्या नंबर प्लेटवर लिहिलेले शब्द स्पष्ट शब्दांत दिसले पाहिजेत. पण कायद्याचे उल्लंघन करणे जुनी बाब आहे. मध्य प्रदेशातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. जेथे एका भाजप आमदाराला कारच्या नंबर प्लेटवर चौकीदार लिहिल्याबद्दल दंड आकारण्यात आला आहे.

आपण फोटोत पाहू शकता की, महिंद्राच्या सब -4 मीटर एसयूव्ही नंबर प्लेटच्या अगदी वर एक मोठी नंबर प्लेट लावलेली दिसत आहे. भाजप आमदार राम डांगोर यांच्या विरोधात खंडवा पोलिसांनी चौकीदार लिहिल्याबद्दल मोटर वाहन अधिनियम कलम 51 च्या उल्लंघनासाठी एक चलन जारी केले आहे.

संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना खंडवा पोलिस प्रमुख सिद्धार्थ बहुगुणा म्हणाले की, आमदार राम डांगोर यांच्या कारला मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल सोमवारी संध्याकाळी ट्रॅफिक पोलिसांना रोखले होते. ज्यावेळी कार आडवली गेली त्यावेळी आमदाराने पोलीसांसोबत चर्चा केली आणि त्यांनी पावती स्वीकारली नाही.

तथापि, नंतर ही पावती त्यांना न्यायालयाद्वारे पाठविली गेली. आमदार राम डांगोर यांच्या मते, ट्रॅफिक पोलिसांनी माझ्या वाहनास रोखले आणि म्हणाले की मी माझ्या वाहनावर चौकीदार लिहिणार नाही, कारण ते आचारसंहिताचे उल्लंघन होते. मी त्यांना सांगितले की हे फक्त एक शब्द आहे आणि कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडलेले नाही, पण त्यांनी माझे ऐकले नाही आणि मला दंड भरावा असे सांगितले.

Leave a Comment