15 मिनिटे उशीरा आला म्हणून उद्योगपतीला न्यायाधीशांनी बसवून ठेवले 4 तास

court
नवी दिल्ली – 1997 च्या उपहार सिनेमा जळीत कांड प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात उशिरा आल्याने बांधकाम क्षेत्रातील उद्योगपती सुशील अन्सल यांना दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने चार तास बसण्याची शिक्षा सुनावली. न्यायालयात सुशील हे १५ मिनिटे उशिराने पोहोचले होते. याप्रकरणी आता ३० मार्च रोजी सुनावणीचा आदेश न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने सुनावणीस न आल्याने सुशील यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

न्यायाधीश दिपक शेरावत यांनी २६ मार्च रोजी उपहार सिनेमाचे मालक सुशील आणि त्यांचे भाऊ गोपाळ अन्सल यांच्याविरोधात न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. न्यायालयात गोपाळ हे वेळेवर आले. पण १५ मिनिटे उशीर सुशील यांना यायला झाला. न्यायाधीश सुशील यांच्या या कृतीमुळे नाराज झाले आणि त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यास त्यांनी नकार दिला. तसेच न्यायालयात चार तास बसण्यास सांगितले.

Leave a Comment