ओप्पो सबब्रांड रेनोचा स्मार्टफोन १० एप्रिलला लाँच

oppo-reno
चीनी स्मार्टफोन कंपनी ओप्पो त्यांच्या रियलमी नंतर नवा ब्रांड रेनो नावाने स्मार्टफोन बाजारात आणत असून त्यातील पहिला फोन १० एप्रिल रोजी चीन मध्ये लाँच केला जात आहे. या फोनची स्पेसिफिकेशन समोर आली असून कव्हर फोटो लिक झाला आहे. चीनी वायाबो साईटवर या फोनची माहिती दिली गेली आहे.

या फोनला युनिक स्टाईल पॉप अप कॅमेरा दिला गेला आहे. हा सेल्फी कॅमेरा वर येताना चाकूचा भास निर्माण करतो आहे. किंवा शार्क माश्याच्या कल्ल्यासारखा भासतो आहे. या फोनला आत्तापर्यंतचा सर्वात पॉवरफुल स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर दिला गेला आहे. तसेच या फोनमध्ये लिक्विड कुलिंग तंत्राचा वापर केला गेला आहे. यामुळे फोन सतत व्हिडीओ पाहण्यासाठी अथवा गेमिंग साठी वापरला गेला तरी तो तापणार नाही. फोन मध्ये ग्राफाइट शीटमध्ये लिक्विड कुल तंत्रज्ञान वापरले गेले आहे.

या फोन साठी ४०६५ एमएएच बॅटरी दिली जाईल आणि तो ५ जीला सपोर्ट करेल असा अंदाज व्यक्त होत आहे कारण कंपनीने नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड मोबाईल कॉंग्रेस मध्ये असाच एक मल्टीफ्रीक्वेन्सी, मल्टी मोड व मल्टी इएन-डीसी कॉम्बिनेशनचा फोन सदर केला होता. या फोनची किंमत साधारण ३० हजार रुपयापर्यंत असेल असा अंदाज आहे.

Leave a Comment