ही पहा जगातील सर्वात मोठी मिठाची गुहा

salt
जगातली सर्वात मोठी मिठाची गुहा इराणच्या केशम आयलँडच्या दक्षिणेला आहे. आज आम्ही तुम्हाला त्या गुहेबद्दल माहिती देणार आहोत. चला मग जाणून घेऊ या गुहेबद्दल… मल्हम गुफा असे या नव्या गुफेचे नाव आहे. 10 कि.मी. ती लांब आहे. ही गुहा इस्रायल जवळ असलेल्या सर्वात मोठ्या डोंगराजवळ माऊंट सोडमच्या जवळ असून हिब्रू विद्यापिठाने याचा शोध 28 मार्चला लावला आहे.
salt1
हिब्रू युनिव्हर्सिटीचे संशोधक एमोस फ्रम्किन यांनी 1980मध्ये या गुहेचा नकाशा तयार केला होता. दक्षिण इराणमध्ये या गुहेचा 2006मध्ये शोध लागला. त्यानंतर जगातली ही सर्वात मोठी मिठाची गुहा म्हणून ओळखायला लागली. मिठाचा अंश या गुहेच्या दरवाजांवरच्या पाण्यात सापडला. पावसाच्या वेळी जंगलात डोंगरांमधील मीठ खाली येऊन ते साचते आणि मग गुहेचा आकार बनतो. हा आकार बदलत जातो.
salt2
याबाबत माहिती देताना नेगव म्हणतात, आतापर्यंत मी पाहिलेल्या गुहांपैकी ही सर्वात सुंदर गुहा आहे. पहाडावरच्या मैदानात ही गुहा उघडते. मिठाचे तुकडे या गुहेच्या छतावर लटकताना दिसतात. ते धातूसारखे चमकतात. या गुहेची लांबी 80 संशोधकांनी मोजलीय आहे.

Leave a Comment