सुंदर महिला बॉडीगार्डचा ताफा बाळगणाऱ्या गडाफीच्या घड्याळाला विक्रमी किंमत

gaddafi
लिबियाचा माजी हुकुमशहा कर्नल मुआम्मर गडाफी याचे घड्याळ दुबईत नुकतेच लिलावात विकले गेले असून या घड्याळाला अपेक्षेपेक्षा ६७५ पट अधिक किंमत मिळाली असे समजते. हे घड्याळ २५ हजार डॉलर्स पर्यंत विकले जाईल आशी अपेक्षा होती मात्र एका अज्ञात ग्राहकाने या घड्याळासाठी तब्बल १,९३,७५० डॉलर्स म्हणजे १ कोटी ३४ लाख रुपये मोजले.

हे घड्याळ कर्नल गडाफी याने खास ऑर्डर देऊन पाटेक फिलीप कंपनीकडून बनवून घेतले होते. १८ कॅरेट सोन्यात बनविलेल्या या घड्याळावर अरबी भाषेतील मजकूर असून त्याचा अर्थ आपल्याला जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा स्वातंत्र मिळेल असा आहे. त्याखाली गडाफीची सही आहे. अशी दोन घड्याळे त्याने बनवून घेतली होती. दुसऱ्या घड्याळात हाच मजकूर इंग्लिश भाषेत आहे.

कर्नल गडाफीने हे घड्याळ १९७८ मध्ये लिबिया कामगार दिवशी घातले होते आणि त्यानंतर त्याने ते त्याच्या सहकाऱ्याला भेट म्हणून देऊन टाकले होते. गडाफी हा अतिशय रंगीन इसम म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या रंगेलपणाच्या अनेक कथा जगात चर्चिल्या जात होत्या. त्याच्यासोबत दरवेळी सावलीसारख्या राहणाऱ्या, सुंदर महिला सुरक्षारक्षक असत. त्यांची निवड तो स्वतः करत असे आणि या महिला सुरक्षा रक्षक कुमारी असत. त्या गडाफीसाठी त्यांच्या जिवाची बाजी लावण्यास तयार असायच्या.

ghadyal
कर्नल गडाफी बंडखोरी करून १९६९ मध्ये लिबियाच्या सत्तेवर आला होता. त्याने ४२ वर्षे अनिर्बंध सत्ता भोगली आणि फेब्रूवारी २०११ मध्ये झालेल्या जनआंदोलनात त्याला सत्तेवरून पाय उतार व्हावे लागले नंतर तो मरण पावला. आपण महिलांना पुरुषांच्या बरोबरीने वागणूक देतो असे तो भासवीत असे. पण प्रत्यक्षात महिला पुरुष वेगळेच असतात असे तो मानत असे. महिलांवर किती विश्वास आहे हे दाखविण्यासठी तो स्वतः सुंदर आणि कुमारी महिलांची निवड करून त्यांना कमांडो प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करत असे आणि त्यात पास होणार्यांना सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्त करत असे.

तो जेव्हा देशात फिरत असे तेव्हा त्याच्या ताफ्यात ३ महिला गार्ड असत तर परदेशात जाताना त्यात आणखी चार जणींची भर पडत असे. ही निवडही तो स्वतः करत असे. या महिला गार्ड लिपस्टिक, नेलपेंट आणि हायहिल्स वापरू शकत असत.

Leave a Comment