निवडणूक रणधुमाळीत चंद्राकडे झेपावणार इस्रोचे चांद्रयान २

chandrayyan
एप्रिलचा महिना देशात लोकसभा निवडणुकीचा महिना आहे आणि त्यामुळे साहजिकच निवडणुकीची रणधुमाळी माजणार आहे. याच वेळी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोमध्ये दुसरे चांद्रयान लाँच करण्याची जोरदार गडबड सुरु झाली आहे. चांद्रयान दोनच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून हे यान चंद्राकडे झेपावण्याच्या स्थितीत आहे. यापूर्वी दोन वेळा या यांच्या लाँचिंगची तारीख हुकली कारण त्याच्या काही चाचण्या बाकी होत्या.

इस्रोचे अध्यक्ष डॉ. के सिवन म्हणाले, आम्ही एप्रिल मध्ये चांद्रयान २ प्रक्षेपित करण्याच्या तयारीत आहोत. पण काही कारणाने हे एप्रिल मध्ये जमले नाही तर जून मध्ये यानाचे लाँचिंग केले जाईल. पहिल्या चांद्रयानासमवेत रोव्हर व लँडर नव्हते. या मिशन मध्ये हे आहे. चांद्रयान २ पूर्वी २०१७ व २०१८ मध्ये लाँच केले जाणार होते पण काही कारणांनी ते शक्य झाले नाही. चांद्रयान दोनचे वजन ३२९० किलो असेल. चंद्र कक्षेत प्रवेश केल्यावर ओर्बिटर लँडर पासून वेगळे होईल आणि लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचताच त्यापासून रोवर वेगळे होईल. ऑर्बिटर मध्ये तसेच रोव्हर मध्येही अनेक संवेदनशील उपकरणे, सेन्सर, कॅमेरे बसविले गेले आहेत. रोव्हर आणि लँडर मिळून चंद्रावरील जमिनीतील खनिजे व अन्य पदार्थांची माहिती पाठवतील व त्यावर इस्रो मध्ये संशोधन केले जाईल.

लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुव भागात उतरविले जाणार असून त्यासाठी दोन जागा निश्चित केल्या गेल्या आहेत. त्यापैकी एक जागा ऐनवेळी ठरविली जाईल. आत्तापर्यंत चंद्राच्या या भागावर कुठल्याच देशाचे यान उतरलेले नाही. या ठिकाणची जमीन नरम आहे आणि तेथे रोव्हर सहज फिरू शकणार आहे. रोव्हरला सहा पाय असून त्याचे वजन २० किलो आहे. याला सोलर उर्जा पुरविली जाणार आहे. २००८ साली पाठविण्यात आलेल्या चांद्रयान १ ला उर्जा कमी पडल्यामुळे ते २९ ऑगस्ट २००९ मध्ये इंधन संपल्याने बंद पडले होते. आताचे चांद्रयान किमान दोन वर्षे माहिती देत राहील

Leave a Comment