तुम्हाला माहित आहेत का पाण्याचे 9 प्रकार

water
सर्वचजण आपल्याला आजारपण दूर ठेवायचे असेल तर भरपूर पाणी प्यावे असे सांगतात. पण ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारे लागू होते. पाण्याचे शरीरातील प्रमाण योग्य असेल तर आपले आरोग्य चांगले राहते असे म्हटले जाते. पाण्यामुळे शरीरात ऊर्जाही राहते आणि मेंदूही सतर्क राहतो. योग्य प्रमाणात जे लोक पाणी पितात, त्यांना याचे फायदे माहीत असतात. पण आपल्या आरोग्याला प्रत्येक प्रकारच्या पाण्यातून फायदा होतोच असे नाही. जवळपास 9 पाण्याचे प्रकार असतात. या प्रत्येक प्रकारानुसार त्याचे फायदे आणि दुष्परिणामही असतात. आज आम्ही तुम्हाला याच पाण्याचे प्रकार, फायदे आणि दुष्पपरिणांमाबाबत सांगणार आहोत.
water2
टॅप वॉटर – टॅप वॉटर म्हणजे आपल्या घरातील नळातून येणारे पाणी. पब्लिक टॉयलेट, किचन सिंक आणि भांडी इ गोष्टी ज्याने आपण साफ करतो. स्वच्छ दिसणारे हे पाणी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते. टॅप वॉटर पिणे पाश्चिमात्य देशात चांगले असले तरी भारतात हे पाणी अजिबात स्वच्छ नसते. या पाण्यात प्लास्टिक तसेच अल्युमिनिअम आणि पेस्टीसाइडचे अंश असतात असे नुकत्याच झालेल्या संशोधनात दिसून आल्यामुळे हे पाणी आरोग्यासाठी नुकसानदायक असते.
water1
मिनरल वॉटर – या पाण्यात नावाप्रमाणेच मिनरल्सचे अधिक प्रमाण असते. सल्फर, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम ही द्रव्ये यात असतात. आपल्या आरोग्यासाठी जी खूप फायदेशीरही असतात. आपल्या पचनसंस्थेला मिनरलयुक्त पाणी मजबूत बनवते. पण हे पाणी महागडे असल्याने ते प्रत्येकजण पिऊ शकत नसल्यामुळे जर आपण मिनरल वॉटर पिऊ शकत नसू तर आपण आपल्या पोषक आहारावर विशेष लक्ष द्यायला हवे.
water5
स्प्रिंग किंवा ग्लेशियर वॉटर – हे एक बाटली बंद पाणी असून हे पाणी आरोग्यासाठी चांगले असते कोणत्याही प्रकारचे विषारी पदार्थ यात नसतात. तसेच यात मिनरल वॉटरमधील सर्व मिनरल्स असतात. पण पूर्णपणे फिल्टर केलेले हे पाणी नसते त्यामुळे असे पाणी प्यायल्याने आपल्याला आजार होण्याची शक्यता असते.
water8
स्पार्कलिंग वॉटर – सोडा पाणी किंवा कार्बोनेट वॉटर म्हणून याला ओळखले जाते. कार्बनडाय ऑक्साइड गॅस या पाण्यात असतो. इतर कोणत्याही पाण्यापेक्षा या पाण्याची चव पूर्णपणे वेगळी असते. कोणत्याही प्रकारची साखर यात अधिकृतपणे नसते. पण कोल्ड ड्रिंक प्रकारात साखरेचे प्रमाण असते. मिनरल्स यात असले तरी हे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर नसते.
water3
डिस्टिल्ड वॉटर – उकळलेले हे पाणी असते. यात तयार होणारी वाफ पुन्हा त्याच पाण्यात मिसळली जाते. तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी स्वच्छ पाणी मिळू शकत नसेल अशावेळी हे पाणी पिण्यास हरकत नाही पण यात विटॅमिन्स किंवा मिनरल्स नसतात.
water6
प्युरिफाइड वॉटर – टॅप किंवा ग्राउंड वॉटर हे पाणी असते, योग्य प्रक्रिया करुन जे शुद्ध केले जाते. यातील सर्व बॅक्टेरिया तसेच विषारी आणि घातक पदार्थ काढून टाकले जातात. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी योग्य बनते. अनेक देशांमध्ये टॅप वॉटर प्युरिफाइड होऊन येते त्यामुळे असे पाणी आरोग्याला घातक नसते.
water7
फ्लेवर किंवा इंफ्यूज – फ्लेवर किंवा इंफ्यूज वॉटर हे पाणी गोड असते. कृत्रिम आणि नैसर्गिक अशा दोन प्रकारात हे पाणी मिळू शकते. हे पाणी साधे नसते तसेच हे पाणी गोड म्हणजेच फ्लेवर असल्याने सध्या बाजारात त्याला खूप मागणी आहे. पण यात कृत्रिम गोडवा मिसळल्याने वजन वाढण्याचा धोका निर्माण होतो. तसेच यामुळे मधुमेह होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
water9
अल्कलाइन वॉटर – या पाण्याची पीएच पातळी खूप जास्त असते. मिनरल्स आणि ओआरपी (निगेटिव्ह ऑक्सिडेशन रिडक्शन पोटँशिअल) यात असते. आपल्या आरोग्यासाठी जे फायदेशीर आहे. या पाण्याची पीएच लेव्हल जास्त असल्याने हे पाणी आपल्या शरीरातील अ‍ॅसिडची पातळी समांतर ठेवण्यास मदत करते. तसेच या पाण्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. हे पाणी आरोग्याला घातक नसले तरीही शरीरातील घातक बॅक्टेरिया यामुळे मरत नाहीत त्यामुळे उलटी होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
water4
वेल वॉटर – हे पाणी सर्वात अस्वच्छ असते. असे पाणी साफही नसते आणि आरोग्यासाठीही चांगले नसते. यातील पॅरासाइट्समुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे पाणी प्यायल्याने आपले आरोग्य बिघडते.

Leave a Comment