मी जर पंतप्रधानपदी असतो, तर अवघ्या काही सेकंदात पाकिस्तानला उत्तर दिले असते

azam-khan
नवी दिल्ली – समाजवादी पक्षाचे नऊ वेळचे आमदार आझम खान हे यंदा पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी याच दरम्यान ‘हिंदुस्तान टाइम्स’ या वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आगपाखड केली आहे.

या मुलाखती दरम्यान आझम खान यांना पाकिस्तानवर एरियल स्ट्राईक केल्यामुळे भाजप पुन्हा सत्तेत येईल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना खान म्हणाले की, पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मोदी सरकारने खुप वेळ घेतला. पाकिस्तान विरोधात केलेल्या कारवाई बाबत मला कोणताही प्रश्न विचारायाचा नाही, पण सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारने केलेल्या दाव्यानुसार हवाई दलाने केलेल्या एरियल स्ट्राईकमध्ये 300हून अधिक दहशतवादी मारले गेले. जर असे झालेच असेल तर पाकिस्तानने त्यांच्यावर अंत्यसंस्कार का केले नाहीत? असे मला पाकिस्तानला विचारायचे आहे. त्याचबरोबर पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मोदी सरकारने खुप वेळ घेतला. जर त्यावेळी मी पंतप्रधानपदी असतो, तर अवघ्या काही सेकंदात पाकिस्तानला या हल्ल्याचे उत्तर दिले असते, असा दावा आझम खान यांनी केला.

सध्या भाजपवर असलेला लोकांचा विश्वास उडाला असून माझ्याविरोधात भाजपमधून कोणीही लढले तरी मला विशेष फरक पडणार नाही असा विश्वास खान यांनी व्यक्त केला आहे. निवडणूक लढणे कायमच आव्हानात्मक असते. मात्र पक्षाने जिल्ह्यामधील मतदारांना लक्षात घेत मला संधी दिली आहे. त्यामुळे भाजपमधून कोणताही उमेदवार असला तरी लोकांचा भाजपवरील विश्वास उडाला असल्याने त्याचा विशेष फरक पडणार नाही, असे खान म्हणाले.

Leave a Comment