ब्रिटन मध्ये झाडांना बांधल्या जाताहेत जाळ्या

nets
ब्रिटन मधील अनेक शहरात सध्या झाडांना जाळ्या बांधल्याचे दृश्य दिसत असून यामागे बांधकाम व्यावसायिक आहेत. ब्रिटनच्या बर्मिंगहॅम, ग्लोचेस्टर, डार्लिंगटन, वॉरविकशायर अश्या अनेक शहरात हे प्रकार झाले असून या भागात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरु आहेत. त्यामुळे झाडांवर पक्षांनी घरटी बांधून परिसर खराब करू नये यासाठी हा प्रकार केला जात असल्याचे आरोप केले जात आहेत.

jali
झाडांवर पक्षांनी घरटी केली तर त्यांच्या विष्ठेने परिसर घाण होईल आणि घरे विकली जाणार नाहीत अशी भीती बांधकाम व्यावसायिकांना वाटते आहे. स्थानिक लोकांनी बांधकाम व्यावसायिकांच्या या कृतीला जोरदार विरोध केला असून न्यायालयात याचिका सादर करण्यासाठी हस्ताक्षर मोहीम सुरु केली आहे. त्यावर ५० हजार जणांनी सह्या केल्या आहेत. काही जणांनी जाळ्या तोडून टाकून झाडांना हिरव्या रिबिनी बांधल्या आहेत.

द. रॉयल सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ बर्ड या स्वयंसेवी संस्था बांधकाम व्यावसायिक विरोधात उतरली असून त्यांनी गेल्या ५० वर्षात ब्रिटन मध्ये पक्षांची संख्या ४ कोटीने कमी झाल्याची आकडेवारी सादर केली आहे. बिल्डरनी झाडांना बांधलेल्या जाळ्यात अडकून काही पक्षी मेल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

Leave a Comment