६० दिवस बेडवर लोळून मिळवा १३ लाख रुपये, नासाची ऑफर

gravity
नोकरी असावी ती आरामाची अशी अनेकांची मनीषा असते. पण पगार हवा तर काम करायला लागणार. दोन महिने नुसते झोपून १३ लाख रुपये मिळविण्याची संधी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने दिली असून २० ते ४५ वयोगटातील २४ उमेदवार त्यासाठी शोधले जात आहेत. या उमेदवारांनी एकदा निंद झाली कि काही करायचे नाही तर बेडवर फक्त झोपून राहायचे आहे. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी संयुक्तपाने हा प्रोग्राम चालविणार असून त्यात गुरुत्वाकर्षण रहित वातावरणात माणसाच्या शरीरात काय बदल होतात याची कारणे आणि निरीक्षणे नोंदविली जाणार आहेत. त्यासाठी योग्य उमेदवारांचा शोध घेतला जात आहे.

ज्या लोकांची यासाठी निवड होईल त्यांना बेडवर डोके थोडे खाली आणि पाय थोडे वर अश्या अवस्थेत झोपावे लागणार आहे. या चाचण्या जर्मनीत घेतल्या जाणार आहेत. या अवस्थेतच हे उमेदवार अंघोळ करणे. वाचन, खाणे, टीव्ही पाहणे, गेम खेळणे अश्या क्रिया करू शकतील..

nasssa
डोके थोडे खाली आणि पाय वर या अवस्थेत रक्तप्रवाहाचा वेग मंदावतो. त्यामुळे स्नायु मध्ये बदल होऊ शकतात. या लोकांना खोलीत थोड्या जास्त प्रमाणात असलेल्या कार्बन डाय ऑक्साईडच्या वातावरणात श्वास घ्यावा लागणार आहे. तसेच उठायचे झाले तर किमान एक खांदा तरी बेडवर टेकवावा लागणार आहे. या चाचण्या सुरु असताना उमेदवाराचे वारंवार एमआरआय काढले जाणार आहेत तसेच अन्य तपासण्या होत राहणार आहेत. डोके खाली केलेल्या अवस्थेत शरीरातील तरल पदार्थ डोक्याकडे जातात आणि आपल्याला वजन नाही अशी अवस्था जाणवते असे सांगितले जाते.

या कामासाठी १२ -१२ उमेदवाराचे दोन गट निवडले जाणार असून या काळासाठी त्यांना १३ लाख रुपये मानधन म्हणून दिले जाणार आहेत.

Leave a Comment