फोटा खराब काढला म्हणून किम जोंगने केली फोटोग्राफरची हकालपट्टी

kim-jong
प्योंगप्यांग – उत्तर कोरियामधील एका फोटोग्राफरला त्याने केलेली एक छोटीशी चूक एवढी महागात पडली की आपली नोकरी त्याला गमवावी लागली. हो फोटोग्राफर बॉसचा फोटो काढत असताना समोर आला अन् बॉसचा फोटो खराब झाला म्हणून या फोटोग्राफरला ही शिक्षा करण्यात आली आहे. कारण हुकूमशहा किम जोंग उन हो त्याचा बॉस आहे.

किम जोंग उन यांनी त्यांचे फोटो काढण्यासाठी एका फोटोग्राफरची नियुक्ती केली होती. गेली अनेक त्यांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरची त्यांनी हकालपट्टी केली आहे. कारण 3 सेकंदासाठी तो फोटोग्राफर किम जोंगच्या एकदम समोर उभा राहिला होता. किम जोंग 10 मार्च रोजी उत्तर कोरियामध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान जनतेला संबोधित करत होता. किम जोंग यांचा पर्सनल फोटोग्राफर त्यावेळी फोटो काढण्यासाठी किम यांच्या समोर आला. किम जोंगला ही गोष्ट एवढी खटकली की त्याने तडकाफडकी या फोटोग्राफरची हकालपट्टी केली.


त्या फोटोग्राफरचे नाव री असे असून फोटो काढण्यासाठी री उभा राहिल्याने कॅमेराच्या फ्लॅश कव्हरने किम जोंगच्या गळ्याचा भाग झाकला गेला. फोटोग्राफरने हा फोटो काढताना दोन नियमांचे उल्लंघन केले. एक म्हणजे किम जोंग यांचा फोटो काढताना फोटोग्राफरला किम यांच्यापासून 2 मीटर अंतर ठेवणे बंधनकारक आहे. तर दुसरा नियम म्हणजे किम जोंग यांच्या समोरासमोर उभे राहून फोटो अथवा व्हिडीओ काढण्यास बंदी आहे. या दोन्ही नियमांचे री यांनी उल्लंघन केल्याने त्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे.

Leave a Comment