श्रीनगर बेसवर परतले विंग कमांडर अभिनंदन

abhinandn
भारतीय हद्दीत घुसलेले पाकिस्तानी एफ १६ फायटर विमान मिग २१ बायसनने पाडून चर्चेत आलेले वायुसेना फायटर पायलट विंग कमांडर अभिनंदन त्यांच्या श्रीनगर हवाई तळावर परतले आहेत. ते सध्या चार आठवड्याच्या मेडीकल लिव वर असून त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना दिल्ली मेडिकल बोर्ड समोर फिटनेससाठी हजर व्हावे लागणार आहे. त्यानंतर ते पुन्हा विमान चालवू शकतील वा नाही याचा निर्णय होणार आहे.

अभिनंदन पाक विमान पळवून लावत असताना पाकव्याप्त काश्मीर मध्ये त्यांचे विमान पडले होते आणि ते पॅराशूटच्या सहाय्याने पाक हद्दीत उतरले होते. स्थानिक लोकांनी त्यांना मारहाण केली होती व नंतर ते दोन दिवस पाक लष्कराच्या ताब्यात होते. तेथून भारतात परतल्यानंतर त्यांना दिल्लीच्या आरआर हॉस्पिटल मध्ये डीब्रीफिंग साठी अॅडमिट केले गेले आणि त्यांच्या अनेक प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या केल्या गेल्या होत्या. त्यांना त्यानंतर चार आठवड्याची मेडिकल लिव्ह दिली गेली आहे.

या काळात ते आईवडिलांच्या घरी आराम करू शकणार होते मात्र त्यांनी बेस वर परतण्याचा निर्णय घेतला. येथेच त्यांची स्क्वाड्रन तैनात आहे. एफ १६ ला पळवून लावण्यासाठी त्यांनी याच बेस वरून उड्डाण केले होते.

Leave a Comment