या आहेत दक्षिण आफ्रिकेतील “बॉक्सिंग ग्रॅनी” आज्या

gogos
जोहान्सबर्ग येथे आजकाल ८० वर्षाच्या आज्या आरोग्य आणि स्वास्थ्यासाठी चक्क बॉक्सिंग करत आहेत शिवाय नृत्य आणि गाणी गात आहेत. याचे चांगले फायदे झालेले दिसून येत असून या आज्या आठवड्यातून दोन वेळा जिम मध्ये जात आहेत. वयोवृद्ध आज्यांसाठी येथे बॉक्सिंग ग्रॅनी नावाने बॉक्सिंग वर्ग सुरु झाला असून १६ वर्षाच्या तरुणींच्या उत्साहाने या आज्या त्यात सामील झाल्या आहेत.

वृद्ध महिलांसाठी २०१४ मध्येच बॉक्सिंग गोगोज नावाच्या या कार्यक्रमाची सुरवात झाली असून आफ्रिकेत ज्येष्ठ महिलांना गोगोज असेच म्हटले जाते. क्लॉड माफोया हे या उपक्रमाशी संबंधित असून ते सांगतात, म्हाताऱ्या व्यक्तींना शारीरिक कसरती बरोबरच सामाजिक आयुष्य अधिक योग्य ठरते. एकाच वयाचे लोक एकत्र भेटतात, बोलतात आणि एकत्र व्यायाम करतात यामुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक परीणाम होतो असे दिसून आले आहे. त्यांचा रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात येत आहे आणि आत्मविश्वास वाढला आहे.

या कार्यक्रमात सामील झालेल्या आपले अनुभव सांगताना म्हणतात, माझ्याच वयाच्या बायकांना भेटून आणि त्यांच्या सोबत व्यायाम करून आम्ही आनंदी होत आहोत. वय झाल्याने आम्हाला काही उमेद राहिली नव्हती मात्र आज आम्ही मजबूत असल्याचा अनुभव घेत आहोत.

Leave a Comment