अरुणाचल मध्ये एकाच मतदार महिलेसाठी मतदान बूथ

arunachal
लोकसभा निवडणुकांची तयारी राजकीय पक्ष जसे करत आहेत तसेच निवडणूक आयोग सुद्धा या तयारीत गुंतला असून त्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणुका यशस्वीपणे पार पडणे एवढीच आयोगाची जबाबदारी नसते तर प्रत्येक मतदार त्याचा हक्क बजावू शकेल यासाठी सुविधा देणे हेही त्यांचे काम असते. त्यासाठी शहरे, दुर्गम भागात सुद्धा मतदान बूथ उपलब्ध करून दिले जातात.

अरुणाचल प्रदेशातील एक ठिकाण असेच अडचणीचे आहे तरीही तेथे एका महीला मतदारासाठी मतदान केंद्र स्थापले गेले आहे. यासाठी टीमला एक दिवसाचा पायी प्रवास करून पोहोचावे लागते. भारत चीन सीमेवरचे हे गाव आहे मालोगम. येथे असलेल्या मतदान केंद्रावर सोकेक तयांग नावाची एकमेव महिला मतदार आहे.

या गावात अन्य मतदार आहेत पण त्यांचे मतदान दुसऱ्या केंद्रावर होते. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी या महिलेच्या पतीचे मतदान याच केंद्राच्या यादीत होते मात्र मतदार याद्या सुधारणा करताना त्याचे नाव नाव अन्य केंद्रावर गेले आहे. यामुळे या केंद्रावर एकच महिला मतदार राहिली आहे. निवडणूक आयोगाची टीम येथे सायंकाळपर्यंत मतदानाची वेळ संपेपर्यंत प्रतीक्षा करेल असे समजते.

Leave a Comment