खरेदीत पुरूषांचा पेशन्स कमीच

लंडन दि. ९ – खरेदी हा खास महिलांची मकतेदारी असलेला प्रांत मानला जात असला तरी पुरूष अनेक वेळा महिलांबरोबर या खरेदी पर्वात सामील होत असतात. मात्र यूके मध्ये नुकत्याच केल्या गेलेल्या सर्वेक्षणानुसार खरेदी प्रकरणात पुरूषांचा पेशन्स सरासरी २६ मिनिटेच टिकतो असे स्पष्ट झाले आहे. महिलांचा पेशन्स संपायला किमान दोन तास लागतात व तेही खरेदी करण्याची वस्तू पसंत न पडल्याने हा कंटाळा येतो. वस्तू पसंत पडत गेल्यास कितीही वेळ महिला खरेदीत घालवू शकतात.

यूकेच्या कॅशबॅक साईट क्विडो डॉट कॉमचे व्यवस्थापकीय संचालक या सर्वेक्षणाचे साक्षीदार होते. ते सांगतात २ हजार पुरूषांचा या सर्वेक्षरात सहभाग होता. चार पैकी एका पुरूषाने जोडीदार अथवा मत्रिणीबरोबर खरेदी करणे बोअरिंग असल्याची कबुली दिली. १० पैकी आठ जणांनी कपडे खरेदी बोअरिंग असल्याचे सांगितले तर ४५ टक्के पुरूषांनी जोडीदार अथवा मैत्रिणीबरोबर एकत्र खरेदी करण्याचे टाळत असल्याचे सांगितले.

खरेदी करताना महिला निर्णय लवकर करत नाहीत. अशा वेळी किवा भूक लागली असताना, तहान लागली असताना, दुकानात गर्दी असेल तर किवा टिव्ही वरचा एखादा चांगला कार्यक्रम हुकतोय असे वाटले तर पुरूषांचा पेशन्स लवकर संपतो असेही आढळले आहे. ४८ टक्के पुरूषांनी महिलाची खरेदी सुरू असताना ते दुसरीकडेच फिरत असतात असे सांगितले तर तीन पैकी १ पुरूष दुकानात न जाता बाहेर थांबणेच पसंत करतात. पाच पैकी एक पुरूष जोडीदाराची खरेदी सुरू असताना अन्य महिलांना टाईप पास म्हणून न्याहाळण्यात वेळ घालवितात तर खरेदीनंतर चांगले जेवण किंवा कांही ट्रुीट मिळण्याचा वायदा असेल तर ५८ टक्के पुरूष खरेदीत आनंद वाटत असल्याचे नाटक करतात.

महिलांच्या या सह शॉपिगमुळे घटस्फोटापर्यंत पाळी येण्याचे प्रमाणही लक्षणीय असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले असल्याचे समजते.