शॉटगन यांच्या काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्त ठरला

shatrughan-sinha
नवी दिल्ली- मागील लोकसभा निवडणूक बहुमतांनी जिंकून केंद्रात भाजप स्थानपन्न झाल्यानंतर भाजपचेच बिहारच्या पटना-साहिबचे खासदार असलेले शत्रुघ्न सिन्हा हे वारंवार भाजपविरोधात वक्तव्य करत होते. त्यांनी मोदींवर राफेलच्या मुद्यावरुनही टीका केली होती. त्याचबरोबर राफेल करारातील मोदींच्या सहभागासंदर्भातही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्याचनंतर शत्रुघ्न सिन्हांनी ट्विट करत मोदींना इशाराही दिला आहे. मोहब्बत करने वाले कम न होंगे, (शायद) तेरी महफिल में लेकिन हम न होंगे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

त्यानंतर आता त्यांच्या काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. येत्या 28 मार्चला शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांचा भाजपने पत्ता कट केल्यानंतर पक्ष सोडण्याचे संकेत त्यांनी दिले होते. लवकरच शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते अखिलेश प्रसाद सिंह यांनी दिली आहे.

28 मार्चला सकाळी 11.30 वाजता शत्रुघ्न सिन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे अखिलेश प्रसाद सिंह यांनी म्हटले आहे. भाजपने शत्रुघ्न सिन्हा यांचा पत्ता कट केल्यानंतर त्यांच्या संपर्कात काँग्रेस होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या उपस्थितीत 28 मार्चला शत्रुघ्न सिन्हा पक्षात प्रवेश करणार असून, ते रविशंकर प्रसाद यांच्याविरोधात पटना साहिबमधून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने गेल्या आठवड्यात बिहारमधील एनडीएच्या 40 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. भाजपने ज्यात पटना साहिबमधून रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली होती.

Leave a Comment