आता स्टार प्रचारकांच्या यादीतूनही आडवाणी, जोशींचे नाव वगळले

combo
नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाच्या वाढीस ज्यांनी आपले मोठे योगदान दिले अशा ज्येष्ठ नेत्यांची पक्षात कायमच उपेक्षा होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. भाजपने सर्वात आधी पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना उमेदवारी नाकारल्यानंतर या जेष्ठांना स्टार प्रचारकांच्या यादीतही स्थान देण्यात न आल्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. सध्याची स्थिती पहाता या ज्येष्ठांना आत घरीच बसा असा संदेश भाजप नेतृत्वाने यातून दिला, हे स्पष्ट आहे.

भाजपने लोकसभा निवडणूकीच्या उत्तर प्रदेशमधील स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. ४० जणांचा यात समावेश करण्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नावाचा यात समावेश आहे. शिवाय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अरूण जेटली, सुषमा स्वराज, उमा भारती हे ही स्टार प्रचारक असणार आहेत. पण यात जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा समावेश नाही. पक्षाने या आधी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्या यादीतही या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना स्थान देण्यात आलेले नाही.

Leave a Comment