सहकर्मचाऱ्याच्या त्या सवयी वैतागून मागितली एवढ्या कोटींची भरपाई

farting
मेलबर्न: जग खुप मोठे यात काही नवीन नाही, पण जगात असे पण व्यक्ती ज्यांच्या सवयी खरोखरच लज्जास्पद आहेत. त्यामुळे त्यांच्यावरच नाहीतर त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीची देखील नाचक्की होते. अशीच काहीशी घटना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे घडली आहे. सहकर्मचाऱ्याच्या पादण्याच्या सवयीने हैराण झालेल्या एका कर्मचाऱ्याने त्याच्या कंपनीकडे भलीमोठी नुकसानभरपाई मागितली आहे. आपल्या सहकर्मचाऱ्याच्या पादण्याच्या सवयीमुळे मला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला असल्याचे म्हणत मला 1.8 मिलियन डॉलरची (12.4 कोटी रुपये) भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ऑस्ट्रेलियातील एका अभियंत्याने केली आहे. त्याचबरोबर त्याने यासाठी कायदेशीर खटला देखील दाखल केला आहे.

आमच्या कार्यालयातील एक सहकर्मचारी वारंवार माझ्याजवळच येऊन पादायचा. त्याचा हा त्रास मी भरपूर महिने सहन केला असल्यामुळे मला 1.8 मिलियन डॉलर एवढी रक्कम भरपाई म्हणून देण्यात यावी, अशी मागणी ऑस्ट्रेलियातील एका अभियंत्याने त्याच्या जुन्या कंपनीकडे केली. या अभियंत्याचे नाव डेव्हिड हिंगेस्ट असे असून डेव्हिडने जुना सहकारी ग्रेग शॉर्टच्या पादण्याच्या सवयीमुळे छळ झाल्याचा दावा केला होता. त्याने त्यासाठी न्यायालयातही धाव घेतली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणात तुमची छळवणूक झाल्याचा कोणताही पुरावा दिसत नसल्याचे न्यायाधीशांनी म्हटले.

आमच्या कार्यालयात मी अक्षरशः भिंतीकडे तोंड करुन बसायचो, आमच्या कार्यालय छोटे होते. ग्रेग हा त्याठिकाणी माझा सहकारी होता आणि माझ्याजवळच येऊन तो पादायचा आणि तेथून निघून जायचा. असे तो दिवसातून भरपूरवेळा करायचा पण त्याचा मला खूप त्रास व्हायचा, असे हिंगेस्टने न्यायालयाला सांगितले. आमच्या कार्यालयात ग्रेग हा मॅनेजर असल्यामुळे त्याने मला अनेकदा शिवीगाळ देखील केली. पण न्यायाधीशांनी त्याचे अपील फेटाळून लावले.

Leave a Comment