भाजपचे माजी प्रवक्ते म्हणतात, लोकांना फसवत आहेत गुजरातचे दोन भामटे

IP-singh
लखनौ- उत्तरप्रदेशातील एका भाजप नेत्याने लोकांना गुजरातचे दोन भामटे फसवत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजपकडून या नेत्यावर कारवाईदेखील करण्यात आली. त्याचबरोबर हे दोन भामटे गुजरातचे देखील नेतृत्व करत असल्याचे भाजपचे माजी प्रवक्ते आयपी सिंह यांनी म्हटले आहे. तसेच सिंह यांनी भाजपने प्रधानमंत्री निवडला आहे की प्रचारमंत्री अशीही टीका देखील केली आहे.

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आझमगढ येथून निवडणूक लढवत असल्याबद्दल त्यांचे आयपी सिंह यांनी ट्विट करत कौतूक केले आहे. तसचे अखिलेश यांनी गरज भासल्यास आपल्या घराचा वापर प्रचार कार्यालयासाठी करु शकता असे देखील म्हटले आहे.

दरम्यान, आयपी सिंह यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. ही कारवाई आयपी सिंह यांनी केलेल्या ट्विट्सनंतर कऱण्यात आली.

Leave a Comment