२५ हजाराची चिल्लर देऊन भरला उमेदवारी अर्ज

coins
देशभरात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकच लगबग सुरु झाली आहे. त्यामुळे अनेक मनोरंजक प्रसंग घडत आहेत आणि त्यांची चर्चा होते आहे. तामिळनाडू मध्ये सोमवारी अशीच एक घटना घडली आणि पाहता पाहता तिची चर्चा सुरु झाली.

तामिळनाडूची राजधानी चेन्नईच्या चेन्नई सेन्ट्रल मतदारसंघातून सोमवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करायला आलेले उमेदवार कुप्पाल्जी देवदोस यांनी अर्जासोबत भरावयाच्या अनामत रकमेसाठी चक्क २५ हजार रुपयांची चिल्लर आणली. ही नाणी मोढ्या कढया आणि अन्य भांड्यात भरून आणली गेली. त्यांनी ही सर्व चिल्लर निवडणूक अधिकाऱ्याच्या स्वाधीन केली तेव्हा त्या अधिकाऱ्याची काय अवस्था झाली असेल याची नुसती कल्पनाही मनोरंजक आहे. बरे अनामत रक्कम भरताना चिल्लर देऊ नये असा नियम नाही. त्यामुळे अधिकरी हि नाणी नाकारू शकत नाहीत.

चिल्लर मोजल्याशिवाय रक्कम बरोबर आहे हे समजणे अशक्यच. त्यामुळे हि चिल्लर जागेवरच मोजावी लागली असेही समजते. चेन्नई मध्ये लोकसभेच्या ३९ जागांसाठी मतदान होणार असून त्यातील पहिला टप्पा १८ एप्रिल रोजी आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २९ मार्चला संपणार आहे.

Leave a Comment