जगातील ही आहे सर्वात उंच इमारतीतील झोपडपट्टी

tower
व्हेनेझुएला या देशाची आर्थिक स्थिती सध्या फारच नाजूक आहे. या देशाच्या राजधानीत म्हणजे काराकास येथील एका इमारतीत झोपडपट्टी वसली असून ही इमारत ४५ मजली आहे. त्यामुळे ही झोपडपट्टी जगातील सर्वात उंच इमारतीतील झोपडपट्टी बनली आहे. या इमारतीची कथा अगदीच वेगळी म्हणावी लागेल. कारण १९९० मध्ये तिच्या बांधकामाला सुरवात झाली तेव्हा ती जगातील उंच इमारतीपैकी एक होती आणि येथे जगातील बड्या कंपन्यांची कार्यालये बनणार होती.

devid
ही इमारत शहराच्या मध्य वस्तीत आहे आणि तिला टॉवर ऑफ डेव्हिड असे नाव दिले गेले आहे. या इमारतीत आज घडीला ३००० लोक राहतात. येथे लिफ्ट नाही. वीज पाण्याची बोंब आहे. खिडक्यांना तावदाने नाहीत, बाल्कन्या नाहीत. कुठे कुठे तर भिंतीपण नाहीत. ही इमारत १९९० साली डेव्हिड बिलेनबर्ग या बिल्डरने बांधायला सुरवात केली पण १९९४ मध्ये त्याचे नशीब फुटले असे म्हणायला हवे कारण तेव्हा बँका संकटात आल्या आणि देशात आर्थिक तंगी निर्माण झाली. त्यामुळे डेव्हिड ही इमारत बांधू शकला नाही व ती शेवटी सरकारच्य ताब्यात गेली..

slum
सेन्ट्रो फायनान्सीएरो कान्फीनाझास या नावाने ही इमारत बांधली जाणार होती कारण त्यात मुख्यत्वे जगातील नामवंत कंपन्यांच्या आर्थिक उलाढाली होणार होत्या. पण सरकारने ती ताब्यात घेतली आणि २००७ पासून येथे अवैध मार्गाने गरीब लोकांनी त्यांची वस्ती केली. पाहता पाहता अवैध धंदे सुरु झाले, अमली पदार्थ व्यापार फोफावला. आज येथे २२ व्या मजल्यापर्यंत लोक राहतात. लिफ्ट नाही पण १० व्या मजल्यापर्यंत रँप आहे त्यामुळे छोट्या गाड्या येथपर्यंत येतात आणि बाकीचे १२ मजले जिने चढून जावे लागते. लोकांनी जुगाड करून पाणी वीज मिळविली आहे. मजेची बाब म्हणजे या इमारतीत कपडे, गरजेच्या वस्तू, ब्युटी पार्लर, दंतवैद्य यांनी दुकाने थाटली आहेत. येथे ७०० कुटुंबे राहतात आणि त्यांनी स्वतः सहकारी सोसायटी स्थापन केली असून २४ तासाची गस्त घातली जाते.

Leave a Comment