जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या सुंदर सहचारिणी व पूर्वप्रेमिका


जगातील अतिश्रीमंत व्यक्ती यांच्या गडगंज संपत्ती, आणि ऐषारामी जीवनशैली साठी ओळखल्या जातात. अश्या व्यक्ती कोठेही गेल्या, किंवा त्यांच्या बाबतीत घडलेल्या लहान-मोठ्या घटना, लगेचच चर्चेचा विषय ठरतात. या व्यक्तींच्या पत्नी किंवा प्रेमिका, आणि पूर्वप्रेमिका देखील कमी ग्लॅमरस नसतात. त्यांच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. क्वचितप्रसंगी अतिश्रीमंत व्यक्तींपेक्षा त्यांच्या पत्नी, प्रेमिका किंवा पूर्वप्रेमिकाच यांच्याबद्दल जास्त कुतूहल पहावयास मिळते. प्रसिद्ध वेबसाईट ‘ हूच ‘ द्वारे जगातील सर्वात श्रीमंत दहा व्यक्ती आणि त्यांच्या इतक्याच प्रसिद्ध आणि सौंदर्यवान असणाऱ्या त्यांच्या पत्नी किंवा पूर्वप्रेमिका यांच्या नावांचा समावेश असलेली यादी नुकतीच जाहीर करण्यात आली.

सुप्रसिद्ध फुटबॉलपटू टॉम ब्रॅडी याच्यामुळे वर्षातून एकदा होणाऱ्या सुपर बॉल लीगमधील फुटबॉल मॅच मध्ये त्यांच्या संघाला विजेतेपद लाभले. या वेळी टॉम च्या खेळीचे खूप कौतुक झाले. टॉमचे वार्षिक उत्पन्न १८० मिलियन डॉलर्स आहे. त्याची पत्नी जीझेल ब्युंडशेन सुप्रसिद्ध मॉडेल आहे. जीझेलचे मॉडेलिंगच्या माध्यमातून होत असलेले वार्षिक उत्पन्न ३६० मिलियन डॉलर्स इतके आहे, म्हणजेच टॉमपेक्षा दुपटीने अधिक. ‘ हूच ‘ वेबसाईटने जाहीर केलेल्या यादीमध्ये टॉम-जीझेल या दाम्पत्याला प्रथम स्थान दिले आहे.

जॉन पॉल डेजोरियो अमेरिकेतील अरबपती बिझिनेसमन आहे. हेअर प्रोडक्ट्स बनवणारी त्यांची कंपनी अमेरिकेतील अग्रणी कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीने बनविलेल्या ‘ पॉल मिशेल ‘ नामक हेअर प्रोडक्ट्सना जगभरातून खूपच मागणी आहे. या कंपनीने बनविलेले शॅम्पू खूप प्रसिद्ध आहेत. जॉनच्या मालकीची मद्य बनविणारी कंपनीदेखील आहे. जॉन ने प्लेबॉय मासिकातील मॉडेल एलीओज ब्रोडीशी विवाह केला आहे. या दाम्पत्याला चार मुले आहेत.

जेम्स पॅकर ऑस्ट्रेलियामधील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. सुप्रसिद्ध अमेरिकन गायिका मराया कॅरीशी जेम्सचे प्रेमसंबंध होते. सार्वजनिक समारंभांच्या ठिकाणी जेम्स आणि मराया पुष्कळदा एकत्र दिसत असत. ते दोघे लवकरच विवाहबद्ध होतील अशी खात्री सर्वांनाच होती, कारण जेम्स ने मराया साठी आणलेल्या दहा मिलियन डॉलर्स किंमतीच्या अंगठीचा मरायाने स्वीकार केला होता. पण या दोघांनी वेगळे व्हायचा घेतलेला निर्णय सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देऊन गेला. जेव्हा हे दोघे वेगळे झाले, तेव्हा मरायाने जेम्सची अंगठी परत केली नाही, या गोष्टीवरून भरपूर उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या.

प्रसिद्ध ऑईल आणि गॅस कंपनी ईबीएक्स ग्रुपचे मालक असलेले ईक बतीस्तान ब्राझील देशामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कंपनीचे वार्षिक उत्पन्न दर वर्षी अधिकाधिक वाढत आहे. व्यवसायाने वकील असलेल्या फ्लाविया सॅमपाइओ या सुंदर तरुणीवर बतीस्तान चा जीव जडला आणि त्यांनी तिला विवाहासाठी मागणी घातली. फ्लाविया दिसायला एखाद्या मॉडेलसारखी देखणी आहे. लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारी एक संस्था फ्लाविया चालविते.

ट्वीटरचे मालक आणि वॉल्ट डिझनीचे बोर्ड मेंबर असणाऱ्या जॅक डोर्सीची गणती अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांमध्ये केली जाते. वयाच्या चौदाव्या वर्षी जॅकने कॉम्प्युटर प्रोग्रामिंग करणे सुरु केले. वयाच्या पस्तिसाव्या वर्षी जॅकने ट्वीटरचे निर्माण केले. जॅकचे वार्षिक उत्पन्न १.२७ मिलियन डॉलर्स असून, त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव कॅट ग्र्रेअर आहे. कॅट व्यवसायाने डिझायनर असून, जॅकच्या जोडीने ती अनेक सार्वजनिक इव्हेंट्सना उपस्थिती लावीत असते.

कॉम्प्युटर सायन्टीस्ट आणि व्यावसायिक असणारे जिम क्लार्क नेटस्केपचे शोधकर्ता आहेत. एके काळी त्यांची कंपनी सर्वात श्रेष्ठ समजली जात असे. त्यांनी सुप्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री असणाऱ्या क्रिस्टी हिंजशी विवाह केला. क्रिस्टीने आतापर्यंत अनेक हॉलीवूड चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. आंद्रे मेल्निकेंचो रशियातील प्रसिद्ध उद्योगपती असून, रशियामधील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये त्यांची गणती केली जाते. त्यांचे वार्षिक उत्पान १२.४ बिलियन डॉलर्स इतके आहे. त्यांची पत्नी अलेक्झान्ड्रा पॉपस्टार होती. ती मॉडेलिंगही करीत असते. आंद्रे आणि अलेक्झांड्राचा विवाह २००५ साली झाला.

हार्वे विन्स्टीन हॉलीवूडमधील बडे प्रस्थ आहे. तो एक नावाजलेला दिग्दर्शक आणि निर्माता आहे. सुप्रसिद्ध प्रोडक्शन कंपनी मीरामॅक्स मध्ये हार्वेची भागीदारी आहे. हार्वेची पत्नी जॉर्जिना ही अभिनेत्री आणि मॉडेल होती. अलीकडे अनेक हॉलीवूड अभिनेत्रींनी हार्वेवर यौनशोषणाचे आरोप केल्यानंतर जॉर्जिनाने हार्वे पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

एलॉक मस्क स्पेस-एक्स आणि टेसला मोटर्स कंपन्यांचे सीईओ आहेत. जगातील पहिली इलेक्ट्रिक कार बनविणारी टेसला मोटर्स ही पहिली कंपनी आहे. मास्क यांनी प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री तलुला रायलीशी विवाह केला आहे. त्यांचे हे विवाहसंबंध दहा वर्षे टिकले, त्यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. वेगळे झाल्यांनतर काही काळाने दोघे पुन्हा एकत्र आले, आणि २०१६ साली पुन्हा वेगळे झाले.

Leave a Comment