बिअर कंपन्या करताहेत याप्रकारे गोसेवा

beer
देशातील काही बिअर उत्पादक कंपन्या गोसेवेत सहकार्य करत आहेत. यामध्ये वापरून शिल्लक राहिलेले धान्य गुरांना चारा म्हणून अगदी कमी किमतीत शेतकरी, डेअरी, पशुपालन करणारे तसेच गोशाला यांना पुरविले जात आहे.

युनायटेड ब्रेवरीज आणि व्हाईट ऱ्हायनो, सिम्बा सारख्या लोकप्रिय बिअर बनविणाऱ्या इनवेब सारख्या कंपन्या हा उपक्रम चालवीत असून तेलंगणातील दोन ब्रेवरीज कंपन्यांनी १० गावातील १५०० पशुपालकांना असे धान्य पुरविले आहे. त्यासाठी इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इंस्टीटयूट फॉर सेमीएरिड ट्रॉपिक्स बरोबर सहकार्य करार केला गेला असल्याचे इनबेवचे अध्यक्ष बेन वरहार्ट यांनी सांगितले. ते म्हणाले गतवर्षी दररोज ७ हजार किलोपेक्षा अधिक धान्य गुरांसाठी दिले गेले होते. पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाना, चंडीगड राज्यात मद्यपीवर सेस लावला जातो. हा सेस मुख्यत्वे गोरक्षण साठी वापरला जातो. त्यानुसार बिअर बाटलीवर ५० पैसे सेस लागतो. बार मध्ये हा सेस ५ ते १० रुपये लागतो.

cowfeed
बिअर तयार करताना जे धान्य वापरले जाणार असते ते बरेच वेळा रोजच्या रोज या धान्याचा वापर होत नाही आणि ते दोन दिवसापेक्षा जास्त टिकत नाही. यामुळे ते स्वस्त किमतीत जनावरांना चारा म्हणून विकले जाते. खुल्या बाजारापेक्षा शेतकरी, पशुपालक यांना हा चारा खूपच स्वस्तात पडतो त्यामुळे ते खरेदी करतात. कंपन्या कॉर्पोरेट सोशल रीस्पॉन्सीलिबीटी त्यामुळे पार पाडू शकतात तसेच थोडा टोकन मनी म्हणजे थोडे पैसे मिळवू शकतात.

भारतात कृषी व्यवसाय हे सर्वात मोठे क्षेत्र आहे आणि बिअर भारतात विकल्या जाणाऱ्या अल्कोहोल सम पेयातील तीन नंबरचे लोकप्रिय पेय आहे. यामुळे कृषी आणि अल्कोहोल व्यवसाय यांचा या निमित्त्ताने ताळमेळ साधला जात आहे.

Leave a Comment